Breaking News
‘सृजनशील पालकत्व’ मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न – गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, जीवनमूल्यांचे अनोखे संस्कार दोन महिलांना मिळाले हरवलेले दागिने; शिरूर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी पोलीस निरीक्षक संदेश यांच्यावर होतोय सर्व स्तरातून होतोय अभिनंदनचा वर्षाव! डॉ. पवन सोनवणे यांच्या राजकारणाच्या एंट्रीने वाघोलीत राजकीय गणिते बदलणार. दक्षिण कोरियात होणाऱ्या 11 व्या सोल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ब्लॉसमिंग आॉलमंड या चित्रपटाची निवड करण्यात आली. शिरूर शहरातून मोटारसायकल चोरी करणारा सराईत चोरटा परजिल्ह्यातून जेरबंद शिरूर पोलिस तपास पथकाची यशस्वी कारवाई मनोवैज्ञानिक दृष्टीकोनातून लिहिलेल्या बाल कविता…

कुणी रस्ता देता का ?

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी
आज दिनांक 15/07/2024 रोजी
कोणी रस्ता देत का रस्ता ?
या आशयाचे फ्लेक्स बोर्ड लावून बहुजन मुक्ती पार्टी शिरूर यांच्या वतीने शिरूर शहरातील संविधान चौकात संवैधानिक पद्धतीने शिरूर नगरपरिषदेचा जाहीर निषेध नोंदविण्यासाठी आनोखे स्वाक्षरी मोहीम हे आंदोलन करण्यात आले.
सदर आंदोलनात शहरातील असंख्य लोकांनी उपस्थित राहुन स्वक्षरी करून शिरूर नगरपरिषद विरोधात आपला निषेध नोंदवीला आहे.
*शिरूर नगरपरिषद हद्दीत मंगलमुर्ती नगर, मदारी वस्ती, ढोमे वस्ती या ठिकाणी पक्का रस्ताच नाही.*
सदर ठिकाणी पावसाळ्यात लोकांना जा-ये करण्यासाठी चिखलातून प्रचंड कसरत करावी लागत आहे.महिला-लहान मुले या चिखला मध्ये घसरून पडत आहेत.काहींचे हात-पाय मोडून जखमी झालेत. तर काही स्वयंभू नेत्यांनी आपले राजकीय वजन वापरून, आपल्या घरापर्यंत रस्ते बनवून घेतले आहेत असे काही नागरिकांचे म्हणणे आहे. आम्हीही नगरपालिकेचे टॅक्स भरतो मग आमच्यावर अन्याय का ? असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित केले गेले.
तरी वरील ठिकाणी शिरूर नगरपरिषद यांनी ताबोडतोब पक्का रस्ता बनवून नागरिकांची होणारी गैरसोय थांबवणे,नाहीतर बहुजन मुक्ती पार्टी येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात तिव्र आंदोलन करणार आहे.
सदर आंदोलनात शहरातील लोकांनी शिरूर नगरपरिषदेचा व सापत्नीक वागणुक देणाऱ्या प्रशासनाचा जोरदार विरोध करून निषेध व्यक्त केला आहे.
यावेळी बहुजन मुक्ती पार्टी चे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष फिरोजभाई सय्यद, शिरूर शहराध्यक्ष समाधान लोंढे, शिरूर शहर सचिव सागर घोलप, शिरूर शहर संघटक अशोक गुळादे, प्रहार सैनिक संघटनेचे पदाधिकारी सुदर्शन शिर्के, भारतीय विद्यार्थी मोर्चा शिरूर तालुका अध्यक्ष सुलतान शेख,तसेच शिरूर शहरातील भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष संपत लोखंडे सर,मनसे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबुबभाई सय्यद,मनसे शिरूर शहर सचिव रवी लेंडे,भारत मुक्ती मोर्चा चे विजय भोईरकर,आम आदमी पार्टीचे अनिल डांगे, अजिज खान, इस्माईल खान, तसेच असंख्य नागरिकांनी स्वक्षरी करून निषेद व्यक्त केला आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 4 2 2 9 4
Users Today : 33
Users Yesterday : 199