मांडवगण फराटा प्रतिनिधी . संतोष साळुंके
भीमा-घोड नद्यांच्या संगमावरील पुरातन हेमाडपंथी मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी.

गणेगाव दुमाला : पवित्र भीमा आणि घोड नद्यांच्या संगमावर वसलेल्या गणेगाव दुमाला येथील श्री संगमेश्वर मंदिरात आज सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची रीघ लागली होती. भक्तिमय वातावरणात भाविकांनी श्री संगमेश्वराचे दर्शन घेतले.

भीमा आणि घोड या दोन पवित्र नद्यांच्या संगमावर असलेले श्री संगमेश्वर मंदिर हे ऐतिहासिक व पुरातन हेमाडपंथी वास्तुशैलीचे मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिराला धार्मिक तसेच ऐतिहासिक महत्त्व असून, परिसरातील भाविकांसाठी हे श्रद्धास्थान आहे.

भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता मंदिर परिसरात आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. प्रशासनाने निधी उपलब्ध करून मंदिर परिसराचे सुशोभीकरण करावे तसेच भाविकांसाठी आवश्यक सुविधा निर्माण कराव्यात, अशी प्रतिक्रिया गणेगाव दुमाला विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन निलेश कोंडे यांनी पुणे ग्रामीण न्युज पोर्टल शी बोलताना केली.
यावेळी संतोष निंबाळकर, जगताप, माऊली गरुड, महावीर कटारिया, अभिजीत साळुंके, वसंत कोंडे आबा शिंदे,आदी उपस्थित होते.
मंदिर परिसरात दिवसभर भाविकांची वर्दळ राहिल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.





Users Today : 134
Users Yesterday : 31