Breaking News
‘सृजनशील पालकत्व’ मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न – गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, जीवनमूल्यांचे अनोखे संस्कार दोन महिलांना मिळाले हरवलेले दागिने; शिरूर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी पोलीस निरीक्षक संदेश यांच्यावर होतोय सर्व स्तरातून होतोय अभिनंदनचा वर्षाव! डॉ. पवन सोनवणे यांच्या राजकारणाच्या एंट्रीने वाघोलीत राजकीय गणिते बदलणार. दक्षिण कोरियात होणाऱ्या 11 व्या सोल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ब्लॉसमिंग आॉलमंड या चित्रपटाची निवड करण्यात आली. शिरूर शहरातून मोटारसायकल चोरी करणारा सराईत चोरटा परजिल्ह्यातून जेरबंद शिरूर पोलिस तपास पथकाची यशस्वी कारवाई मनोवैज्ञानिक दृष्टीकोनातून लिहिलेल्या बाल कविता…

जगतापवाडी शाळेत विद्यार्थ्यांच्या दिंडीचे आयोजन

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी: दत्तात्रय कर्डिले दत्तात्रय कर्डिले
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगतापवाडी येथे विद्यार्थ्यांच्या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. अतिशय उत्साही, भक्तीमय वातावरणात पालखीची सुरुवात ग्यानबा तुकाराम नामाचा जयघोष करत करण्यात आली. वारीचा उत्साह मुलांच्या अंगी भिनला होता.

वाडीतील ज्येष्ठ मार्गदर्शक व वारकरी सत्यवान जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व मयंक मेमाणे मृदंग वादनाने सर्व मुले मोठ्या उत्साहाने निघाली. पालखी नेहमीप्रमाणे प्रदक्षिणा घालून रिंगणाच्या ठिकाणी हजर झाली. त्या वेळी पावसानेही हजेरी लावत या बाल दिंडीचे स्वागत केले. नेहमीप्रमाणे वाडीतील सर्व ग्रामस्थ व महिला त्या ठिकाणी मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्या. त्यांनी दिंडीचे पूजन केले. रिंगण सोहळ्यामध्ये सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. वारीतील वेगवेगळे खेळ मुलांनी सादर केले. मुलांबरोबरच मोठ्यांनीही पारंपरिक अशा फुगडीचा मनमुराद आनंद लुटला. रिंगण सोहळा जवळजवळ एक तासभर चालला. या रिंगण सोहळ्या दरम्यान गावातील युवा वर्गही उपस्थित होता.
भगवी पताका | पाऊलाचा ठेका ||
वारीचा या डंका | सर्व दूर ||
शुभ्र वस्त्र अंगी | कितीही असो तंगी ||
भजनात रंगी | पांडुरंगा ||
अशा शब्दांत ग्रामस्थांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.
रिंगण सोहळा आटोपल्यानंतर सर्व बाळ गोपाळ नेहमीप्रमाणे सद्गुरु दौलत बाबांच्या मठावरती जमा झाले. त्या ठिकाणी आरती करण्यात आली. आरती झाल्यानंतर रुचकर अशा प्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. येथील युवकांच्या माध्यमातून सर्व मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी दिंडी सोहळ्या प्रसंगी कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अभिजीत जगताप, माजी उपसरपंच मोहन शिंदे ,रमेश देवकर, चेअरमन नवनाथ जगताप, सागर देवकर, अक्षय जगताप, आप्पासाहेब जगताप, राजेंद्र भोसले, माजी अध्यक्ष राहुल जगताप, सत्यवान जगताप, अनिल जगताप,सागर जगताप, गणेश मेमाणे, शरद जगताप, घनश्याम जगताप,नितीन शिंदे, दीपक शिंदे ,सिद्धार्थ शिंदे, रमेश देवकर सत्यवान जगताप, शरद जगताप, आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्याध्यापिका मधुबाला वेताळ, उपक्रमशील शिक्षिका व औषधी वनस्पती पुस्तकाच्या संपादिका मीना म्हसे, उपशिक्षक काशिनाथ डफळ व अंगणवाडी ताई व मदतनीस यांनी या दिंडीचे आयोजन केले होते.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 4 2 1 9 8
Users Today : 136
Users Yesterday : 503