शिरूर प्रतिनिधी
प्रहार दिव्यांग क्रांती संस्थाचे मा, जिल्हाध्यक्ष महेंद्र निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली शिरूर तहसील कार्यालय समोर दिव्यांगांचे साखळी उपोषण आंदोलन करण्यात आले होते.
प्रहार दिव्यांग क्रांती संस्था शिरूर तालुका आणि शहराच्या वतीने शिरूर तहसील कार्यालय इमारतीच्या प्रवेशद्वारावर हे उपोषण करण्यात आले होते.
शिरूर तालुक्यातील आणि शहरातील तमाम दिव्यांग व्यक्तींनी साखळी उपोषण यशस्वी करण्यासाठी आपला हातभार लावला.
या आंदोलनामध्ये दिव्यांग व्यक्तींच्या विविध मागण्यांचे निवेदन शिरूर चे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांना देण्यात आले.
यावेळी प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचे पुणे जिल्हा अध्यक्ष महेंद्र निंबाळकर तालुकाध्यक्ष रामदास भुजबळ उपाध्यक्ष दत्तात्रय तरटे महिला अध्यक्ष ज्योती गोसावी, शहराध्यक्ष मनीष सोनवणे उपाध्यक्ष सुरज गुप्ता तसेच प्रहार ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे संस्थापक तुषार हिरवे, व्हा.चेअरमन वैभव झांजे संचालक अनिल शिंदे, आणि मोठ्या संख्येने प्रहार सेवक,दिव्यांग बंधू भगिनी उपस्थित होते.
यावेळी आलिया तिरंदाज, रेणुका मल्लव, मंगल गायकवाड ,जयश्री पन्नी यांनी आपले मनोगत व्यक्त केले व आपल्या विविध मागण्या जनतेसमोर मांडल्या.
शिरूर तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींच्या समस्या सोडवण्यासाठी लवकरात लवकर विशेष कॅम्पचे आयोजन करून, विविध विभागातील अधिकारी कर्मचारी तलाठी मंडळ अधिकारी यांच्या उपस्थित अशा विशेष कॅम्प आयोजिन करण्यात येईल व दिव्यांग व्यक्तींच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे, शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी लेखी पत्र देत, उपोषण मागे घेण्यास सांगितले .
