Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

सचिन बेंडभर यांच्या बालकाव्यसंग्रास पाचवा राज्यस्तरीय पुरस्कार

Facebook
Twitter
WhatsApp

सरदवाडी प्रतिनिधी: दत्तात्रय कर्डिले
सारांश मासिक यांच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा उत्कृष्ट काव्य निर्मिती पुरस्कार प्रसिद्ध बालसाहित्यिक सचिन बेंडभर पाटील यांच्या दिलीपराज प्रकाशनने प्रकाशित केलेल्या व पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रम मंडळात एम.ए.च्या अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या मामाच्या मळ्यात या बालकाव्यसंग्रहास जाहीर झाला असल्याची माहिती सारांश मासिकाचे सल्लागार संपादक, व्यंगचित्रकार डॉ. अनिल दबडे व मासिक सारांश यांच्या व्यवस्थापक मंडळाने नुकतीच दिली. या काव्यसंग्रहास 2023 सालचा हा पाचवा पुरस्कार आहे. रोख रक्कम, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सारांश मासिकाकडून उत्कृष्ट काव्य निर्मिती पुरस्कार 2023 मध्ये प्रकाशित झालेल्या बाल साहित्यास नुकतेच जाहीर झाले. या पुरस्कारासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रवेशिका आल्या होत्या. बालसाहित्य विभागात पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध बालसाहित्यिक सचिन बेंडभर पाटील लिखित मामाच्या मळ्यात या प्रकाशित झालेल्या बाल साहित्यास राज्यस्तरीय उत्कृष्ट काव्य निर्मिती पुरस्कार सारांश मासिकाचे सल्लागार संपादक, व्यंगचित्रकार डॉ. अनिल दबडे व मासिक सारांश यांच्या व्यवस्थापक मंडळाने नुकताच जाहीर केला आहे.
सचिन बेंडभर यांच्या काव्यसंग्रहास 2023 सालचा हा पाचवा सन्मान असून याआधी चंद्रपूर येथील कवितेचे घर यांच्या वतीने बापूरावजी पेटकर बालकाव्य पुरस्कार, ऍक्टिव्ह टीचर सामाजिक प्रतिष्ठान, महाराष्ट्र यांच्या वतीने उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार, साहित्य सेवा प्रज्ञा मंच यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङमय पुरस्कार आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दामाजीनगर यांच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा संभाजी सलगर पुरस्कृत ज्ञानोबा सलगर स्मृती पुरस्कार असे प्रतिष्ठेचे मानले जाणारे पुरस्कार या बालकाव्यसंग्रहास मिळाले आहेत. या काव्यसंग्रहासाठी 2023 सालचा हा मानाचा पाचवा सन्मान असून या काव्यसंग्रहास निवड समितीने राज्यस्तरीय उत्कृष्ट काव्य निर्मिती पुरस्कार जाहीर केला आहे.
मामाच्या मळ्यात या काव्यसंग्रहात लहान मुलांसाठी मनोरंजनात्मक कविता असून त्यांच्या ज्ञानात भर पडेल अशा प्रेरक कवितांचा समावेश आहे. लहान बाल चमुंसाठी संस्काराची शिदोरी म्हणजे सचिन बेंडभर पाटील यांचा मामाच्या मळ्यात हा काव्यसंग्रह!
दिलिपराज प्रकाशनने हा काव्यसंग्रह प्रकाशित केला असून प्रसिद्ध चित्रकार सागर नेने यांनी विषयाला अनुरूप चित्रे व आकर्षक मुखपृष्ठ रेखाटले आहे. प्रसिद्ध बालसाहित्यिक सुरेश सावंत यांनी या पुस्तकाची पाठराखण केली आहे.
सचिन बेंडभर यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 9 9
Users Today : 7
Users Yesterday : 21