शिरूर प्रतिनीधी
दि .24/06/52024 रोजी दुपारी 03/00 वाजण्याच्या सुमारास शिरूर,ता.शिरूर, जिल्हा.पुणे येथील, मार्केट यार्ड शिरूर च्या मागील बाजूस फिर्यादी कैलास महादेव शेळके रा दानेवाडी, ता श्रीगोंदा, हे मोटर सायकल वरून काकडी घेऊन निघाले असता ,आरोपी 1) आशिष संपत थेऊरकर , 2) संपत जयवंत थेऊरकर व इतर अनोळखी सात ते आठ ईसम यांनी सर्वांनी दिनांक 22/06/2024 रोजी दाणेवाडी गावी झाल्याचे भांडणाचा राग मनात धरून , फिरत्या फिर्यादी ना शिवीगाळ, दमदाटी करुन सर्वानी हाताने, लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
यामध्ये फिर्यादी खाली पडला असता, आशिष संपत थेऊरकर याने त्याच्या हातातील धारदार हत्याराने फिर्यादीच्या उजव्या पायाच्या अंगठ्यावर जोराने मारून अंगठ्याला मोठी जखम करून दुखापत केली .
तसेच शेळके यांचा मुलगा संदेश शेळके भांडण सोडवायला आला असता, त्यालाही मारहाण केली . तसेच सर्व आरोपीनीं जाताना फिर्यादी यांना आमच्या गावात कसे राहतो हेच बघतो असे बोलून धमकी दिली.
कैलास शेळके यांनी शिरूर पोलीस स्टेशनला दि. 25/06/2024 रोजी मध्यरात्री गु र न 592/2024 IPC कलम 326, 143, 147, 148, 149,323,504,506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस हवालदार अनिल आगलावे हे करत आहे.






Users Today : 7
Users Yesterday : 9