Breaking News
ओन्ली वुमन्स जिम व श्री स्वामी समर्थ सेवा संस्था शिरूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहातसाजरा शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

रामदास आठवले केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री यांनी घेतली मा.उपसभापती नीलम गोऱ्हे यांची भेट घेत…

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे प्रतिनिधी:सागर पवार
दिनांक १७/०६/२४ रोजी आठवले साहेबांनी मुंबई येथील निवासस्थानी नीलम ताई यांची भेट घेतली.

भेटी दरम्यान साहेबांनी जुन्या आठवणींना उजाळा देत मराठवाडा विद्यापीठाचे नाव डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ करावे या आंदोलना पासून सुरू झालेला ते आज पर्यंतच्या राजकीय प्रवासात जीवनातील अनेक चढ,उतार व आपला अनुभव कथन करत मार्गदर्शन केले .तसेच ताईंनी रिपब्लिकन पक्षापासून सुरू झालेली राजकीय वाटचाल व बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशक्ती व भीम शक्ती कल्पनेचा केलेला उदय कसा झाला , त्यातून शिवसैनिक व भीमसैनिक यांचे निर्माण झालेले एकोप्याचे नाते याचा प्रकर्षाने उल्लेख केला .
येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष व महायुती अधिक जोमाने व नव्या उमेदीने काम करेल असा विश्वास व्यक्त केला .
याप्रसंगी आठवले साहेब व नीलम ताई यांच्या अनुभवाचा व राजकीय प्रवासाचा निश्चितच उपयोग होईल व पदाधिकार्याचा आत्मविश्वास वाढेल असे मत उपस्थित महिला पदाधिकारी यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी कलाताई शिंदे उपनेता शिवसेना व शिल्पा बोडके या ही उपस्थित होत्या.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 1 1 5
Users Today : 23
Users Yesterday : 21