Breaking News
ओन्ली वुमन्स जिम व श्री स्वामी समर्थ सेवा संस्था शिरूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहातसाजरा शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

सचिन बेंडभर यांचे साहित्यिक कार्य युवकांसाठी प्रेरणादायी: खासदार शिवाजीराव आढळराव पाटील

Facebook
Twitter
WhatsApp

सरदवाडी प्रतिनिधी: दतात्रय कर्डिले

पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध साहित्यिक सचिन बेंडभर यांचे साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असून त्यांची आजपर्यंत 55 पुस्तके प्रकाशित आहेत. तसेच त्यांच्या साहित्य निर्मितीची दखल महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने घेऊन त्यांच्या कळो निसर्ग मानवा या कवितेची निवड सहावीच्या पाठ्यपुस्तकात केली आहे. तर दिलीपराज प्रकाशनने प्रकाशित केलेल्या मामाच्या मळ्यात या काव्यसंग्रहाची निवड सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एम.ए. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात नुकतीच झाली असल्याने त्यांचे साहित्यिक कार्य युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत लोकप्रिय खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केले.

जेष्ठ लेखक तथा निवृत्त तहसीलदार सूर्यकांत रखमाजी थोरात यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा, ग्रंथतुला व काळीज या कथासंग्रहाच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात खासदार शिवाजीराव आढळराव पाटील बोलत होते. यावेळी काळीज या कथासंग्रहाचे प्रकाशन साहित्यिक सचिन बेंडभर पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आढळराव पाटील उपस्थित होते. यावी आढळराव पाटील यांनी मंचर येथील साहित्यिक कार्याचा आढावा घेतला. शांता शेळके, ग.ह. पाटील, भीमसेन देठे यांचा साहित्यिक वारसा चालवणारी पिढी तयार झाली पाहिजे, असे मत यावेळी खासदार आढळराव पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते वसंतराव जाधव, प्रमुख पाहुणे म्हणून शिरूरचे लोकप्रिय खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील, साहित्यिक सचिन बेंडभर पाटील, ज्येष्ठ साहित्यिक सूर्यकांत थोरात, स्तंभ लेखक व पत्रकार विठ्ठल वळसे पाटील, कोल्हापूर येथील निवृत्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, पुणे येथील निवृत्त उपविभागीय अधिकारी सुनंदा गायकवाड आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 1 1 5
Users Today : 23
Users Yesterday : 21