Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी रंगला कर्तुत्ववान महिलांचा  ‘स्त्री गौरव पुरस्कार 2024’  सन्मान सोहळा 

Facebook
Twitter
WhatsApp

 

पुणे प्रतिनिधी सागर पवार:
रॅम्प वॉक, महिलांसाठी रंगलेले विविध गेम्स, खेळ पैठणीचा मध्ये धम्माल मस्ती आणि लकी ड्रॉ च्या माध्यमातून बक्षिसांची लयलूट करत महिलांनी दिवसभर वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचा आनंद लुटला. निमित्त होते  जनकल्याण बहुउद्देशीय फौडेशन, पुणेच्या वतीने जागतिक महिला दिना निमित्त आयोजित  कर्तुत्ववान महिलांना ‘स्त्री गौरव पुरस्कार 2024’ सन्मान सोहळ्याचे.

अण्णाभाऊ साठे सभागृह सातारा रोड, पुणे येथे हा सन्मान सोहळा दुपारी 12 ते रात्री 8 या दरम्यान पार पडला.यावेळी सिने अभिनेत्री मेघना झुझम,अभिनेत्री आरती शिंदे, अभिनेता सिध्देश्वर झाडबुके, अभिनेता महेश सोनवणे,अभिनेत्री राधिका पिसाळ,कविता गायकवाड, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई,फौडेशनचे उपाध्यक्ष आणि अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, शितल पाटील, सचिन पाटील, शोभा पाटील आणि जनकल्याण बहुउद्देशीय फौडेशनचे अध्यक्ष, माजी पोलिस उपायुक्त, अभिनेते, निर्माते आणि अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचे लीगल सल्लागार शहाजीराव एस. पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.

जनकल्याण बहुउद्देशीय फौडेशन, पुणेच्या वतीने जागतिक महिला दिना निमित्त  कर्तुत्ववान महिलांना ‘स्त्री गौरव पुरस्कार 2024’ देवून सन्मानित करण्यात आले. यामध्ये निवेदिका, लेखिका रुतुजा फुलकर, व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षक अश्विनी कामठे, तृतीयपंथी समाजसेविका कादंबरी शेख (टी.जी), गायिका प्रतिभा थोरात, समाजसेविका सुनीता मोडक, ह. भ. प. अर्चनादीदी साळूंखे (सगर) , प्राणी मित्र रंजना घाटपांडे, आरोग्यसेविका अंजु काझी,फॅशन डिझायनर सुमय्या पठाण आदींना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 9 7
Users Today : 5
Users Yesterday : 21