पुणे प्रतिनिधी :—
हवेली तालुक्यातील उपक्रमशील शाळा जगतापवाडी येथील इयत्ता पहिली मधील आयुष विक्रम जगताप हा मंथन स्पर्धा परीक्षेत झालेल्या राज्य गुणवत्ता यादीत चौथा आल्याने शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. औषधी वनस्पती पुस्तकाच्या संपादिका, शिष्यवृत्ती तज्ज्ञ, आदर्श शिक्षिका मिना अशोक म्हसे यांनी त्याला मार्गदर्शन केले होते.
वढू खुर्द येथून नुकत्याच बदली होऊन रुजू झालेल्या मिना अशोक म्हसे यांनी 15 ऑगस्टच्या जाहीर कार्यक्रमात ग्रामस्थांना शाळेला गुणवत्ता देणार असल्याचे जाहीर केले. जगतापवाडी शाळेचा विद्यार्थी राज्यात चमकेल अशा प्रकारचे काम या शाळेत होईल, असा विश्वास दिल्यानंतर वर्षभर मेहनत घेऊन आपला दिलेला शब्द सार्थ ठरवत अवघ्या वर्षभरातच त्यांनी मंथन स्पर्धा परीक्षेत पहिलीच्या वर्गातील आयुष विक्रम जगताप या विद्यार्थ्याला राज्याच्या गुणवत्ता यादीत चौथ्या स्थानावर आणण्यात यश मिळवले.
स्वराज्य रक्षक फाउंडेशन व भारतीय पत्रकार संघ यांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन….
निकाल समजताच शालेय व्यवस्थापन समितीने विद्यार्थी आयुष विक्रम जगताप व मार्गदर्शक शिक्षिका मिना अशोक म्हसे यांचा सन्मान शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन केला. शाळेचे मुख्याध्यापक श्रीमती मधुबाला वेताळ व उपशिक्षक काशिनाथ डफळ यांचे ही शालेय व्यवस्थापन समितीने अभिनंदन केले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामस्थ, पालक, शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकाऱ्यांनी आयोजन केले.
