शिरूर मधील हॉटेल मार्वल बनत आहे गुन्हेगाराचे ठिकाण…. असे असून हॉटेल अजून ही सुरू राहणार….?

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:
शिरूर शहरातील मुख्य रस्त्यावर असणारे हॉटेल मार्वल इन लॉजिंग’ सध्या गुन्हेगारी कृत्यांचा मोठा अड्डा बनल्याचे धक्कादायक वास्तव आठ दिवसात दोनदा समोर आले आहे. वास्तविक पाहता ड्रग्स सापडल्या नंतर,हॉटेल सील करण्यात आले असते,१९ ते २१ रोजी घडलेला प्रकार झालाच नसता.

चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून एका तरुणीला शिरूरमधील या लॉजवर आणून तिला नशेची पावडर देऊन तिच्यावर पाशवी अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी सात जणांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा भयानक प्रकार १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत लॉजमधील एका खोलीत घडला. संशयित आरोपींनी पीडित तरुणीला चांगले पैसे मिळवून देणाऱ्या नोकरीचे आमिष दाखवले आणि कारमधून हॉटेल मार्वल इन लॉजिंग येथे आणले. तिथे आरोपींनी तिला जबरदस्तीने पांढऱ्या रंगाची नशा आणणारी पावडर खाऊ घातली.

यानंतर पीडितेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत तिच्या इच्छेविरुद्ध वेळोवेळी लैंगिक अत्याचार करण्यात आले. तसेच अनिकेत पठारे यानेही विनयभंग करून पीडितेला शिवीगाळ व दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून दीपक श्रीमंदीलकर (रा. रामलिंग, शिरूर), अजय माणिक घेगडे (रा. माठ, जि. अहिल्यानगर), ऋषीकेश रामदास ढवळे (रा. ढवळगाव, जि. अहिल्यानगर), दीपक दत्तात्रय भोसले (रा. मावळेवाडी, जि. अहिल्यानगर), सागर साधू ढवळे (रा. ढवळगाव, जि. अहिल्यानगर), अनिकेत दिलीप पठारे (वय २६, रा. मावळेवाडी, जि. अहिल्यानगर) आणि एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी दीपक दत्तात्रय भोसले याला २२ ऑगस्ट रोजी पहाटे १.४३ वाजता अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक हणमंत नकाते करत असून लॉजिंगमधील सीसीटीव्ही फुटेज, वापरलेले वाहन व इतर पुरावे जप्त करण्याचे काम सुरू आहे.

याच हॉटेल मार्वल इन लॉजिंगवर अवघ्या दोन दिवसांपूर्वी एमडी ड्रग्स विकणारे तस्कर पकडले गेले होते. आता नोकरीच्या बहाण्याने तरुणीवर सामूहिक अत्याचारासारखी भयानक घटना घडल्याने शिरूर शहरात ,या लॉजवर चालणाऱ्या सततच्या बेकायदा प्रकारांमुळे लॉज मालकाला कोणाचे अभय आहे असा संतप्त सवाल नागरिक विचारत असून, पोलीस प्रशासन अजून ही शांत का?अशा गुन्हेगारी केंद्रांवर पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई करून लॉज सील करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 9 0 1 9 7
Users Today : 29
Users Yesterday : 323