मांडवगण फराटा : प्रतिनिधी
संतोष साळुंके
इनामगाव नलगे मळा येथे शनिवारी पहाटे नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. या धाडसी आणि यशस्वी मोहिमेनंतर बिबट्याला जुन्नर येथील बिबट निवारण केंद्रात नेत असताना मांडवगण फराटा येथे काही मिनिटे थांबून वनपाल भानुदास शिंदे साहेब तसेच रेस्क्यू टीममधील जवानांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.

बिबट्याच्या दहशतीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अशा परिस्थितीत वनविभागाच्या पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने मोहीम राबवत बिबट्याला जेरबंद केले. त्यामुळे नागरिकांनी वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

यावेळी बाळासाहेबभाऊ फराटे इनामदार, राजीव फराटे पाटील, गणेश फराटे, पोपट जगताप, डॉ. महेश जाधव, मेजर पांडुरंग चौधरी, पाचकर सर तसेच समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.

नरभक्षक बिबट्याला जेरबंद केल्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून, वनविभागाच्या रेस्क्यू टीमच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.





Users Today : 29
Users Yesterday : 323