Breaking News
प्रथमेश अशोक ढाकणे यांना युवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले…. अंगारकी चतुर्थीनिमित्त म्हसोबावाडीच्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची अलोट गर्दी ‘नवसाला पावणारा गणपती’ अशी श्रद्धा; एक हजारांहून अधिक भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ शिरूर मध्ये हॉटेल चालक महिलेस बेदम मारहाण….. गणेगाव दुमाला विविध कार्यकारी सोसायटीची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात बाभुळसर बु!सार्वजनिक गणपती उत्सव निमित्त आदर्श सरपंच दिपाली महेंद्र नागवडे व महेंद्र नागवडे यांस सत्यनारायण महापूजा आरतीचा मान. श्री वाघेश्वर देवस्थान मित्र मंडळातर्फे महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन

अहिल्यानगर असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेत कारेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल विजयी….

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:
शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील,कारेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलने राज्यस्तरीय स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले.

नुकत्याच अहिल्यानगर येथे, अहिल्यानगर असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेत कारेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल, कारेगावच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला .

दिनांक १५ व १६ ऑगस्ट २०२६ रोजी प्रवरानगर, अहिल्यानगर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत १४,१६ व १८ वर्षे वयोगटात या शाळेच्या खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांत सहभाग नोंदवत,उल्लेखनीय यश संपादन केले.


विजयी खेळाडू पुढील प्रमाणे:

श्रेया अनिरुद्ध भड लांब उडी — प्रथम क्रमांक ११० मीटर हर्डल्स ,अक्षदा शरद शिंदे,भालाफेक — प्रथम क्रमांक ,२०० मीटर — तृतीय क्रमांक ,तनिष्क नवनाथ चव्हाण ,११० मीटर हर्डल्स — द्वितीय क्रमांक,सायली राजेंद्र काव्हरे,११० मीटर हर्डल्स — तृतीय क्रमांक ,क्रांती हिरामण देशमुख,ट्रायथलॉन
(60मी, 600मी, लांब उडी)
तृतीय क्रमांक,वैष्णवी संदीप सप्रे ,गोळा फेक -तृतीय क्रमांक.

मेहनत, जिद्द, शिस्त आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर या खेळाडूंनी मिळवलेले हे यश निश्चितच अभिमानास्पद आहे,“जिंकणे हा योगायोग नसतो; त्यामागे असते अथक मेहनत, योग्य मार्गदर्शन आणि जिंकण्याची जिद्द”असे मार्गदर्शन करताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी सांगितले.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे व
संस्थेचे अध्यक्ष ॲड.संग्राम नाथाभाऊ शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली,
संस्थेचे सचिव शुभम सर्जेराव यादव,प्राचार्य स्नेहलता यादव
पी.टी. शिक्षक सागर कोकाटे सर व सर्व शिक्षक वृंदयांनी या स्पर्धेसाठी अतोनात परिश्रम घेतले.

या यशाबद्दल सर्व खेळाडू व शिक्षकांचे पालकांनी कौतुक केले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 9 3 9 0 6
Users Today : 9
Users Yesterday : 27