शिरूर प्रतिनिधी:
अगदी घरगुतीपद्धतीने व केमिकल न वापरता , “कमी किंमत व उत्तम दर्जा” हाच उद्देश ठेवत, संपूर्ण महाराष्ट्र व विदर्भात आपली आगळी वेगळी ओळख निर्माण करत , काही काळातच उंच भरारी घेत “प्रथमेश मसाले”नावाप्रमाणे आपली प्रगती करत आहे.
दि.३०/०७/२०२६ रांजणगाव येथे कंपनी ने सेल्स टीम, डिस्ट्रीब्युटर व कंपनी मधील स्टाफ यांच्या बिझनेस ग्रोथ साठी , प्रसिध्द बिजनेस ग्रोथ ट्रेनर योगेश खेडकर यांचे ट्रेनिंग आयोजित केले होते.

यावेळी सेल्स टीम व डिस्ट्रीब्युटर यांना मार्केट मध्ये काम करत असताना येणाऱ्या अडचणी जाणून घेत, त्या कशा पद्धतीने सोडवाव्यात यावर मार्गदर्शन केले. आपली कंपनी आपली जबाबदारी, हे जर प्रत्येकाने अंगीभूत केले तर, कंपनी लवकरच १०० करोड चे टार्गेट पूर्ण करेल असा विश्वास त्यांनी यावेळी सेल्स टीम, डिस्ट्रीब्युटर व कंपनी स्टाफ यांना दिला.
यावेळी उपस्थित सर्व सेल्स टीम, डिस्ट्रीब्युटर, प्रमोटर यांचे हेल्थ चेकअप करण्यात आले व शिरूर तालुक्यातील नॉर्मल डिलिव्हरी साठी प्रसिध्द असणाऱ्या डॉक्टर किर्ती मदने यांनी महिलांच्या अनेक समस्याजाणून घेत त्यावर उपाय व काम करत असताना,भविष्यात स्वतः ची काळजी कशी घ्यावी व सध्या वरती डोक काढत असणाऱ्या कॅन्सर सारख्या आजाराला आळा कसा घालावा यावर मार्गदर्शन केले.

कंपनीचे CEO अशोक ढाकणे व कंपनीचे COO विजय दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेनिंग व हेल्थ चेकअप च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.






Users Today : 0
Users Yesterday : 119