
मांडवगण फराटा (प्रतिनिधी): संतोष साळुंके
अनेक दिवसांपासून मांडवगण फराटा येथे आणि परिसरात वारंवार खंडित होणारी जिओ मोबाईल नेटवर्क सेवा अखेर सुरळीत झाली आहे. या समस्येमुळे नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी तसेच ऑनलाइन व्यवहार करणाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
या गंभीर प्रश्नाला पुणे ग्रामीण न्यूजने ठळकपणे वाचा फोडल्यानंतर संबंधित यंत्रणा आणि जिओ कंपनीने दखल घेत आवश्यक तांत्रिक उपाययोजना केल्याने परिसरातील मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट सेवा पूर्ववत सुरू झाल्याचे नागरिकांनी सांगितले.

गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही प्रश्न कायम होता. मात्र बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर या समस्येवर तत्काळ कार्यवाही झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

नागरिकांनी भविष्यात अशी समस्या पुन्हा उद्भवू नये, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणीही केली आहे.





Users Today : 0
Users Yesterday : 27