शिरूर प्रतिनिधी:प्रकाश गवळी
वाघोली (ता.हवेली) येथे सांस्कृतिक कार्य विभाग, पुराभिलेख संचालनालय, मुंबई, महाराष्ट्र शासन आणि भारतीय जैन संघटनेचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील इतिहास विभाग वाघोली यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय मोडी कागदपत्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

मोडी लिपी ही भारतीय ज्ञान प्रणालीतील महत्त्वाची लिपी असून या लिपीतील दुर्मिळ ऐतिहासिक कागदपत्रांच्या मदतीने मध्ययुगीन काळातील भारताचा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय इतिहास समजण्यास मोठी मदत होते असे महाराष्ट्र राज्य पुराभिलेख संचालनालयाचे संचालक सुजितकुमार उगले यांनी उद्घाटन प्रसंगी मत व्यक्त केले. पुढे ते म्हणाले, महाराष्ट्रात सुमारे साडे सतरा कोटी ऐतिहासिक कागदपत्रे जतन करण्यात आली असून ती सध्या पुणे, मुंबई, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील विभागीय पुराभिलेख कार्यालयांमध्ये जतन करण्यात आल्याचे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाच्या प्रसंगी बीजेएस प्रबंध समिती सदस्य सुरेश साळुंके, सी.ई.ओ. डॉ. रविंद्रसिंह परदेशी, प्राचार्या डॉ. मनिषा बोरा, प्राचार्य संतोष भंडारी, सहाय्यक संचालक गणेश खोडके, महेश पाटील, शैला जंगम, ॲड सतीश हरगुडे उपस्थित होते.
मोडी कागदपत्र प्रदर्शनात आज्ञापत्र, वतनपत्र, सनदपत्र, करारनामापत्र, वर्षासनपत्र, इनामपत्र, दानपत्र, सरंजामपत्र, अभयपत्र, ताकीद पत्र, दस्तकपत्र, राजीनामापत्र, मिरासी वतनपत्र, विनंतीपत्र, हकीकत पत्र, सनद पत्र, बातमीपत्र, जामीनकतबापत्र, जबाब पत्र, तहनामापत्र, यादीपत्र निकालपत्र, निवाडापत्र, कौलनामापत्र, क्रयपत्र, आभारपत्र अशा स्वरूपातील विविध दुर्मिळ पात्रांची मांडणी केलेली होती.
मोडी कागदपत्र प्रदर्शनाला बीजेएस माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाघोली, बीजेएस वसतिगृह वाघोली, माध्यमिक आश्रम शाळा वाघोली, छत्रपती संभाजी हायस्कूल व जुनिअर कॉलेज कोरेगाव भीमा, विष्णूजी शेकोजी सातव विद्यालय वाघोली, हरी उद्धव धोत्रे माध्यमिक विद्यालय फुलगाव, बीजेएस कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय वाघोली, टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खडकी, कै. तुकाराम धोंडीबा पठारे महाविद्यालय चंदननगर, वाडिया कॉलेज पुणे, मॉडर्न कॉलेज पुणे अशा स्वरूपात विविध शाळा, महाविद्यालयातील १३०० विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्त यांच्यासह शिक्षक विजय फापळे, शुभांगी गायकवाड, रामदास औटी, विक्रम बस्तापुरे, तानाजी हंडाळ, नारायण खुळे, डॉ. प्रकाश पांढरमिसे, प्रा. अश्विनी गायकवाड, गणेश सातव यांनी प्रदर्शनातून मोडी कागदपत्रे समजून घेतली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मनिषा बोरा यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सहदेव चव्हाण तर डॉ. सचिन कांबळे यांनी आभार मानले.
मोडी कागदपत्र प्रदर्शनाचे आयोजनात महत्त्वपूर्ण योगदान प्रा. बंडू ब्राम्हणे, प्रा. निखील आगळे, डॉ. रुपाली सोनवणे, श्याम पाटील, गिरीष शहा व इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मनिषा बोरा यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सहदेव चव्हाण तर डॉ. सचिन कांबळे यांनी आभार मानले. मोडी कागदपत्र प्रदर्शनाचे आयोजन सहाय्यक संचालक गणेश खोडके, महेश पाटील, डॉ. मनिषा बोरा, डॉ. भूषण फडतरे, डॉ. सचिन कांबळे, प्रा. बंडू ब्राम्हणे, प्रा. निखील आगळे, डॉ. रुपाली सोनवणे, श्री. श्याम पाटील, श्री. गिरीष शहा व इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी केले.






Users Today : 9
Users Yesterday : 137