बाभूळसर बुद्रुक ग्रामपंचायत येथे स्वर्गीय अजित दादा पवार यांची जयंती साजरी.

Facebook
Twitter
WhatsApp

प्रतिनिधी .संतोष साळुंके
ता.23

काल झालेल्या स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या जयंती निमित्त ग्रामपंचायत बाभुळसर बु!येथे शिरूर हवेलीचे आमदार माऊली आबा कटके यांच्या सुविद्य पत्नी मनीषा ताई कटके आणि गावच्या आदर्श सरपंच सौ. दिपाली महेंद्र नागवडे, यांनी दादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, प्रतिमेचे पुजन केले.

यावेळी मा. सरपंच गणेश मचाले , अमित नागवडे मांडवगण विकास सोसायटी माजी चेअरमन संतोष पाटील फराटे , ह. भ. प. आण्णा महाराज फराटे,तलाठी शुभम जाने,संदीप जगदाळे, पुणे जिल्हा युवक उपाध्यक्ष महेंद्र नागवडे,संतोष टेकवडे,सुभाष नाना फराटे,अंकुश टेकवडे,ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ नागवडे,अमोल नागवडे संत तुकाराम सोसायटीचे व्हा. चेअरमन,चेअरमन श्री.दत्त पतसंस्था हरिभाऊ नागवडे,सुनील नागवडे,महेंद्र रणदिवे संत तुकाराम सोसायटी संचालक,भाऊसो नागवडे, अमित नागवडे, पत्रकार अल्लाउद्दीन अल्वी तसेच इतर मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.


यावेळी बोलताना सरपंच दिपाली नागवडे म्हणाल्या गावच्या विकास कामामध्ये पुण्याचे पालक मंत्री असताना अजित दादा पवार साहेब यांचा मोलाचा वाटा आहे
दादांचे मोलाचे योगदान असल्यामुळे आमच्या गावच्या विकासात वैभवात भर पडली आहे.
विविध विकास कामे दादांच्या माध्यमातून आमच्या गावात झाली आहेत.त्याच प्रमाणे दादांच्या अनेक आठवणींना ज्येष्ठ व्यक्तीनं कडून उजाळा देण्यात आला.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 4 0 9 1
Users Today : 2
Users Yesterday : 101