पिंपळसुटी येथे बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp

मांडवगण(प्रतिनिधी) : संतोष साळुंके
पिंपळसुटी येथे बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मच्छिंद्र प्रल्हाद भोसले या शेतकऱ्याकडे संदीप वारे हे शेतमजूर कामाला असून त्यांची पत्नी आणि मुलगी भाग्यश्री ही तिघे गोठ्यात झोपले असताना
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्रीनंतर सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास बिबट्याने तिच्यावर झडप घालून तिला उचलून नेले. कुटुंबीयांनी आरडाओरडा केल्यानंतर ग्रामस्थांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली.

बराच वेळ शोध घेतल्यानंतर गावालगतच्या शेतात बालिकेचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच वन विभाग व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

या घटनेमुळे पिंपळसुटी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 3 9 9 2
Users Today : 4
Users Yesterday : 80