Breaking News

व्यापाऱ्यांच्या अडचणींवर तात्काळ उपाययोजना करण्यात येणार ; बेकायदेशीरपणे त्रास दिल्यास गुन्हे दाखल होणार.. शिक्रापूर पोलिसांचा इशारा

Facebook
Twitter
WhatsApp

[बेकायदेशीर पार्किंग, फुटपाथ वरील अतिक्रमण ,गतिरोधक, कंपन्यांचे बस थांबा ,अनधिकृत फ्लेक्स बोर्ड_या अडचणींवर उपाययोजनाबाबत व्यापाऱ्यांशी बैठकीतून साधला संवाद]

शिक्रापूर:प्रतिनिधी:विनायक साबळे

शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या वतीने बुधवारी(दि.8 ) रोजी शिक्रापूर येथील व्यापारी असोसिएशन आणि विविध दुकानांचे व्यापारी प्रतिनिधी यांची समन्वय बैठक संपन्न झाली. यामध्ये व्यापाऱ्यांची सुरक्षिता , रस्त्यावर होत असलेली बेकायदा पार्किंग, फुटपाथवरील उभे असलेले जाहिरातींचे बोर्ड , रस्त्यातील उभे असलेल्या रिक्षा, मोकळी वाहने, भाजीवाले, विरुद्ध दिशेने येणाऱ्या गाड्या, मोठ्या आवाजाचे गाड्यांचे सायलेंन्सर, अनधिकृत लाईट खांम, विनापरवाना लावलेले फ्लेक्स बोर्ड, अनाधिकृत गाड्यांचे पार्किंग पान टपऱ्या यावर योग्य उपाययोजना करून भयमुक्त व कायद्याचे संरक्षण असलेले वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचा संदेश यावेळी उपस्थित व्यापारी वर्गाला देण्यात आला.

बैठकीत विविध दुकानांमधील व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी, सुरक्षा व्यवस्था आणि कायदा-सुव्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.कोणीही व्यक्ती अथवा रोड रोमिओ बेकायदेशीर दबाव टाकत असेल, पैसे किंवा खंडणीची मागणी करत असेल, दमदाटी अथवा धमक्या देत असेल, तर त्याची तात्काळ माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले. अशा प्रकारच्या तक्रारींमध्ये संबंधितांविरुद्ध तातडीने गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा शिक्रापूर पोलिसांनी दिला.


यावेळी परिसरातील चोऱ्या रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना, करून परिसरात नियमित पोलीस पेट्रोलिंग वाढविणे, वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी नियोजन, करण्यात येणार असुन व्यापाऱ्यांच्या अडचणींवर विशेष लक्ष देउन व्यापाऱ्यांच्या अडचणींवर सविस्तर चर्चा झाली. उद्योग-व्यवसाय सुरळीत आणि सुरक्षितपणे सुरू राहण्यासाठी शिक्रापूर पोलीस स्टेशनकडून २४ तास आवश्यक ते सहकार्य व संरक्षण दिले जाईल, अशी ग्वाही बैठकीत देण्यात आली. तसेच कोणतीही संशयास्पद घटना अथवा बेकायदेशीर प्रकार निदर्शनास येताच विलंब न करता पोलीस प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. बैठकीतील या भूमिकेचे उपस्थित व्यापारी प्रतिनिधींनी स्वागत करत पोलीस प्रशासनाचे आभार मानले. शिक्रापूर परिसरातील व्यापारी आणि पोलीस प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्यासाठी अशा बैठका नियमितपणे आयोजित करण्याची अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.


यावेळी अनेक व्यापारी वर्गांनी व व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नवनाथ सासवडे, संभाजी मांढरे यांनी आपल्या समस्या मांडल्या.
निरीक्षक यादव यांनी आपला मोबाईल नंबर व्यापाऱ्यांना देऊन आपल्या समस्या फोन द्वारे अथवा मेसेज द्वारे मांडण्याबाबत आणि त्याचा वेळोवेळी पाठपुरावा करण्याबाबत सूचना दिल्या.

यावेळी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, गोपनीय अंमलदार संदीप कारंडे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नवनाथ सासवडे, संभाजी मांढरे, भाजपा नेते पंढाभाउ गायकवाड, निलेश राऊत, शरद टेमगिरे, प्रकाश चव्हाण अतुल पानमंत अंकुश घारे या व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक व्यापारी हजर उपस्थित होते.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 2 9 0 8
Users Today : 276
Users Yesterday : 188