पुणे:प्रतिनिधी: विनायक साबळे
पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) धडाकेबाज कारवाई करत अवैध गावठी पिस्टल बाळगून परिसरात दहशत निर्माण करण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना अटक केली आहे. आरोपींकडून तीन गावठी बनावटीची पिस्तुले, १५ जिवंत काडतुसे आणि एक बलेनो कार असा एकूण ५ लाख ३७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मंगेश शंकर मासोळे (वय २४), सूरज संजय शेलार (वय २६) आणि रोहित प्रेमदास भुजवणे (वय २४, सर्व रा. यवत, ता. दौंड, जि. पुणे) हे बिगर नंबरच्या पांढऱ्या रंगाच्या बलेनो कारमधून भांडगाव येथील सोनाक्षी मंगल कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत येणार आहेत.
माहितीची खातरजमा करून पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचला. संशयित कार तेथे येताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले. अंगझडतीदरम्यान आरोपींकडून तीन गावठी बनावटीची पिस्तुले, १५ जिवंत काडतुसे तसेच बलेनो कार असा एकूण ₹५,३७,५०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३, ७ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, शस्त्रांचा पुरवठा कुठून झाला, त्यांचा वापर कोणत्या गुन्ह्यासाठी होणार होता आणि या टोळीचे इतर साथीदार आहेत का, याचा तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, सहाय्यक फौजदार आसिफ शेख, सहाय्यक फौजदार सचिन घाडगे, पोलीस हवालदार तुषार पंदारे, जनार्धन शेळके, संजू जाधव, विकास पाटील, राजू मोमीन, योगेश नागरगोजे, गुरुनाथ गायकवाड, सुभाष राऊत, विकास कापरे, संदीप देवकर, पोलीस अंमलदार धीरज जाधव आणि पोलीस अंमलदार मोहन भानवसे यांनी सहभाग घेतला.





Users Today : 249
Users Yesterday : 188