“ड्रग्जला नाही”चा निर्धार; सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसीत जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन उत्साहात*

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:
शिरूरमधील श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेच्या सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी येथे जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दरवर्षी २६ जून हा दिवस जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन (International Day Against Drug Abuse and Illicit Trafficking) म्हणून साजरा केला जातो.

Screenshot

अंमली पदार्थांचे सेवन आणि त्याच्या बेकायदेशीर तस्करीमुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत समाजात जनजागृती करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
कार्यक्रमासाठी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक (PSI) हणमंत नकाते प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी अंमली पदार्थांच्या तस्करी व सेवनाशी संबंधित कडक कायद्यांची सविस्तर माहिती देत, कोणत्याही प्रलोभनांना किंवा दबावाला बळी न पडता उज्ज्वल भविष्याकडे लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. तरुण पिढीला व्यसनाधीनतेच्या भयानक विळख्यातून वाचवणे ही संपूर्ण समाजाची आणि काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी औषधांचा गैरवापर शरीरासाठी कसा घातक ठरू शकतो, याचे शास्त्रोक्त विश्लेषण सादर केले. तसेच, औषधांचा अंमली पदार्थ म्हणून होणारा गैरवापर रोखण्यासाठी फार्मसी विद्यार्थ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. भविष्यातील आरोग्य व्यवस्थेचा मुख्य कणा असलेल्या विद्यार्थ्यांनी स्वतः व्यसनांपासून दूर राहून समाजातही जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र थिटे उपस्थित होते. तसेच संस्थेचे सचिव धनंजय थिटे, डॉ. हर्षवर्धन थिटे आणि संस्थेचे समन्वयक शिवाजीराव पडवळ यांनीही उपस्थित राहून विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी प्रेरित केले.


यावेळी विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रदर्शन व घोषणांच्या माध्यमातून ‘ड्रग्जला नाही म्हणा’ (Say No To Drugs) हा संदेश परिसरात पोहोचवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विशाल कारखिले यांनी केले. प्राचार्य डॉ. सचिन कोठावदे, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मिळून अंमली पदार्थांना नकार देण्याची तसेच व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी कटिबद्ध राहण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेत कार्यक्रमाची सांगता केली.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 1 2 7 6
Users Today : 4
Users Yesterday : 511