शिरूर ग्रामीण रुग्णालयात धक्कादायक प्रकार…

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:
शिरूर ग्रामीण रुग्णालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. यावेळी एका डॉक्टरांच्या कक्षात मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

Screenshot

 

डॉक्टरच्या कक्षात आढळ्या बाटल्या:

मिळालेल्या माहितीनुसार, बीव्हीजी कॉन्ट्रॅक्टद्वारे नियुक्त करण्यात आलेले डॉक्टर विलास तांदळकर यांच्या कक्षात दारूच्या बाटल्यांचा खच आढळल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचवेळी रुग्णालयाबाहेर एक मनोरुग्ण उपचाराच्या प्रतीक्षेत असल्याचेही समोर आले.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी याच रुग्णालयात गर्भवती महिलेला उपचार नाकारल्याच्या घटनेमुळे प्रशासनावर टीका झाली होती. आता या नव्या प्रकारामुळे सरकारी रुग्णालयातील रुग्णसेवा आणि शिस्तीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
डॉक्टरांच्या कक्षात दारूच्या बाटल्या कशा आल्या? त्या कोणाच्या आहेत? याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


या प्रकरणी आरोग्य विभाग आणि संबंधित प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 1 2 7 6
Users Today : 4
Users Yesterday : 511