शिरूर प्रतिनिधी:
आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ निमित्त शिरूर येथील ओन्ली वुमन्स जिम आणि श्री स्वामी समर्थ सेवा संस्था, प्रीतम प्रकाश नगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला सामूहिक योग साधना कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
योग, प्राणायाम आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला महिला व नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला.

यावेळी वुमन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रिया बिरादार यांनी उपस्थितांचे कौतुक करत अशा आरोग्यदायी आणि समाजिताच्या उपक्रमाची पुढेही सातत्याने गरज असल्याचे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमामध्ये विविध वयोगटातील महिला व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत योगाचे महत्त्व अनुभवले.
या कार्यक्रमादरम्यान योगी आचार्य गोपेश बह्मपुरीकर यांनी उपस्थितांना योग साधना, प्राणायाम तसेच दैनंदिन जीवनात आरोग्यदायी सवयी अंगीकारण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी योग हा केवळ शारीरिक व्यायाम नसून शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल साधणारी जीवनपद्धती असल्याचे सांगण्यात आले. सहभागी नागरिकांनी विविध योगासनांचा सराव करत निरोगी, आनंदी आणि सकारात्मक जीवन जगण्याचा संकल्प केला.
या कार्यक्रमास शिरूर पंचायत समितीच्या सभापती स्वाती विठ्ठल घावटे उपस्थित होत्या तसेच अल्पसंख्याक महिला विभागाच्या रेश्मा शेख, ज्येष्ठ पत्रकार सतीश धुमाळ, सुदर्शन दरेकर, अर्जुन बढे ,राजू शेख , भाजपाचे माजी शिरूर शहराध्यक्ष केशव लोखंडे, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अजित डोंगरे, निलेश नवले, विजय नरके,हुसेन शेख यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते प्रितेश फुलडाळे, हरीश शर्मा व वुमन्स जिमच्या सर्व ट्रेनर उपस्थित होत्या.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला श्री स्वामी समर्थ सेवा संस्था प्रीतम प्रकाश नगर यांचे विशेष सहकार्य लाभले व या उपक्रमातून आरोग्य, सकारात्मकता, सामाजिक एकात्मता आणि निरोगी जीवनशैलीचा प्रभावी संदेश देण्यात आला.. सर्व नागरिक व मान्यवरांचे आभार सुजाता पाटील यांनी केले.






Users Today : 51
Users Yesterday : 360