Breaking News
बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक रस्ते अपघातातील मृत्यू कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना सूचवा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक संपन्न अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज राजेभोसले यांची सर्वानुमते निवड नवीन कार्यकारी संचालक मंडळाचीही घोषणा जागा शोधताय?

बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी: संतोष साळुंके
सोलापूर जिल्ह्यातील उपक्रमशील शाळा पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित आदर्श बाल व प्राथमिक मंदिर येथे प्रसिद्ध साहित्यिक सचिन बेंडभर यांची चांदोमामा ही कविता शाळा व्यवस्थापनाने शाळेच्या भिंतीवर घेतली असून येता जाता विद्यार्थी, पालक आणि शिक्षक ती कविता वाचत असल्याने ही कविता शाळेचे आकर्षण ठरली आहे.

Screenshot

15 जून 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात शाळा सुरू झाल्या. प्रत्येक शाळेत शाळा प्रवेशोत्सवाची व मुलांच्या स्वागताची वेगवेगळी तयारी केली जाते. आदर्श बाल व प्राथमिक मंदिर शाळेमध्ये प्रवेशोत्सव दरवर्षी वेगवेगळ्या थीमद्वारे साजरा करण्यात येतो. यावर्षी जंगल थीम, झाडे लावा पर्यावरण वाचवा असा विषय ठेवला होता. त्यावर आधारित वेगवेगळ्या विषयांची पोस्टर्स तयार करण्यात आली होती. योगायोगाने सचिन बेंडभर यांची चांदोमामा ही कविता लेखिका आशा पाटील यांच्या वाचनात आली. ती विषयाला अतिशय समर्पकशी वाटली. मग त्याची डिजिटल प्रिंट काढून त्यांनी ती शाळेमध्ये लावली. मुलांना व पालकांना ती खूप आवडली. येताजाता सर्वच ही कविता वाचत असल्याने मुलांना वाचनाची गोडी लागली आहे.


आदर्श बाल व प्राथमिक विद्या मंदिर या शाळेच्या आदर्श मुख्याध्यापिका माया धनंजय सांगोलकर व उपक्रमशील शिक्षिका आशा पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 0 1
Users Today : 1
Users Yesterday : 57