शिरूर प्रतिनिधी:
श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेच्या सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी (डी.फार्म.) राष्ट्रीय सेवा योजना युनिट तसेच आनंद ऋषीजी नेत्रालय व्हिजन सेंटर शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १० जून रोजी जागतिक नेत्रदान दिनानिमित्त महाविद्यालयामध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
गुजरमळा प्रभाग मधील नगरसेवक फक्त खुर्ची साठी व नावा साठी निवडून आले का? अजून काही उद्देश होता? https://punegraminnews.com/archives/3113
या शिबिरामध्ये नेत्र तपासणी, मोतीबिंदू तपासणी, चष्म्याचा नंबर तपासणी तसेच विविध नेत्रविकारांचे निदान करून योग्य तो वैद्यकीय सल्ला देण्यात आला. मोतीबिंदूचे निदान झालेल्या रुग्णांना आनंद ऋषीजी हॉस्पिटल अहिल्यानगर येथे अल्पदरामध्ये मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्याचा सल्ला देण्यात आला.

यावेळी नेत्रतज्ञ रोहित स्वामी व संदीप पाडोळे यांनी नेत्रदानाचे महत्त्व त्याविषयीचे समज, गैरसमज व दृष्टीहीनांना नवजीवन देण्यासाठी नेत्रदानाची गरज याबाबत मार्गदर्शन केले.

या शिबिरामध्ये डी.फार्मसी, बी. फार्मसी, नर्सिंग महाविद्यालयाचे तसेच विजयामाला स्कूल व ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व नागरिक अशा एकूण १९७ जणांनी सहभाग नोंदविला.
संस्थेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र थिटे साहेब यांनी ग्रामीण भागात आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी तसेच विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यासाठी संस्था नेहमीच प्रयत्नशील असल्याचे सांगत नेत्र तपासणीचे महत्त्व अधोरेखित केले तसेच सर्वांना मरणोत्तर नेत्रदान करण्याचे आवाहन देखील केले.

या शिबिराच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शहा सर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम समन्वयक प्रा. विशाल कारखिले, प्रा. निखिल केदारी, प्रा. निशा केसकर, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.






Users Today : 3
Users Yesterday : 614