प्रतिनिधी .संतोष साळुंके
मांडवगण फराटा आणि परिसरात शुक्रवारी झालेल्या मुसळधार वादळी पावसाने बहुतांश शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान केले. अक्षरश शेतकऱ्यांच्या बांधावर गेले असता मन हेलावून जाणारे दृश्य पहावयास मिळाले. हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या प्रकोपाने हिरावून घेतला .उभी पिके भुईसपाट झालेली पहावयास मिळाली.

शेतकरी प्रभाकर राऊत यांची केळीची संपूर्ण बाग उध्वस्त झाली.
तसेच अनेक शेतकऱ्यांच्या फळबागांचे अतोनात नुकसान झाले.पुणे ग्रामीण न्युज शी बोलताना मांडवगणचे उपसरपंच भाऊसाहेब कोळपे म्हणाले की आम्ही ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने तलाठी शुभम जाणे .आणि कर्मचारी यांच्या सहाय्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचा पंचनामा केला आहे.महत्वाची बाब म्हणजे उपसरपंच भाऊसाहेब कोळपे यांनी स्वतः कृषी राज्यमंत्री दत्ता मामा भरणे यांची भेट घेऊन .

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ताबडतोब नुकसान भरपाई मिळावी यासाठी निवेदन दिले,त्याचं प्रमाणे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी करून . दखल घेऊन भरपाई देण्याचे आश्वासन दिले.खरोखरच अस्मानी संकटाचा सामना करताना शेतकऱ्याच्या प्रपंचाचे अतोनात नुकसान होते.पण हतबल न होता बळी राजाला पुन्हा नव्या जोमाने उभे रहावे लागते.





Users Today : 1
Users Yesterday : 54