Breaking News
करडे घाटात थरारक गोळीबार; एका युवकाची हत्या… दुसरा गंभीर जखमी शिरूर तालुक्यात खळबळ; गोळीबाराने परिसर दणाणला जामखेड तालुक्यातील श्री क्षेत्र चौंडीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा ३०१ वी जयंती महोत्सव. कर्तव्य, शिस्त आणि समर्पणाचा आदर्श; शिरूर आगारातील सहा कर्मचाऱ्यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न अखेर जरांगेंचे उपोषण स्थगित; सरकारच्या आश्वासनांवर मराठा समाजाच्या नजरा! राधाकृष्ण विखे पाटील व प्रसाद लाड यांच्या मध्यस्थीला यश मागण्या पूर्ण होणार का? मराठा समाजात उत्सुकता आणि सावध प्रतीक्षा हडपसर विषारी दारू प्रकरणानंतर हातभट्टी दारूविरोधात कारवाईचा धडाका; रांजणगाव पोलिसांची मोठी कारवाई शिरूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २४ लाखांचा सोन्या-चांदीचा ऐवज चोरणारा नोकर नांदेडमधून जेरबंद

हडपसर विषारी दारू प्रकरणानंतर हातभट्टी दारूविरोधात कारवाईचा धडाका; रांजणगाव पोलिसांची मोठी कारवाई

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर, प्रतिनिधी : सुदर्शन दरेकर पुण्यातील हडपसर येथे घडलेल्या विषारी दारू प्रकरणानंतर राज्यभरात हातभट्टी दारू निर्मिती व विक्रीविरोधात पोलिसांनी मोहीम तीव्र केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी शिरूर तालुक्यातील निमगाव भोगी परिसरात मोठी कारवाई करत गावठी हातभट्टी दारूचा अड्डा उद्ध्वस्त केला.


पोलिसांनी केलेल्या छाप्यात सुमारे १ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये हातभट्टी दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे सुमारे ५०० लिटर कच्चे रसायन, २०० लिटर तयार गावठी दारू तसेच एक अल्टो कार यांचा समावेश आहे.
या प्रकरणी निलेश गुलाब लोंढे (वय ३४, रा. निमगाव भोगी, ता. शिरूर) याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला ३ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीविरुद्ध यापूर्वीही महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Screenshot

विशेष म्हणजे घटनास्थळी आढळून आलेले हातभट्टी दारू निर्मितीसाठीचे रसायन व साहित्य दोन जेसीबी मशीनच्या सहाय्याने जागीच नष्ट करण्यात आले.
ही कारवाई रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


हडपसरमधील विषारी दारू दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू व्यवसायाविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 7 7 7 3 5
Users Today : 355
Users Yesterday : 58