सलग दुसऱ्या दिवशी शिरूर नगरपरिषदेची धडक अतिक्रमण कारवाई; १७७ हून अधिक अतिक्रमणधारकांवर कारवाई

Facebook
Twitter
WhatsApp

रांजणगाव गणपती : सुदर्शन दरेकर
रांजणगाव येथील एचडीएफसी बँकेच्या शाखेत बनावट सोने खरे असल्याचे भासवून गोल्ड लोन घेत तब्बल 17 लाख 76 हजार 700 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी रांजणगाव पोलीस ठाण्यात 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

याबाबत शैलेश लालासाहेब जाधव वय 33, रा. शुक्रवार पेठ, पुणे याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 जानेवारी 2025 ते 28 मार्च 2025 या कालावधीत रांजणगाव येथील एचडीएफसी बँक शाखेत हा प्रकार घडला आहे.

या प्रकरणात लक्ष्मण उर्फ लखन किसन वीर रा. राजापूर, ता. श्रीगोंदा, मच्छिंद्र दिगंबर खैरनार रा. संकल्प सिटी, रांजणगाव, प्रतीक दादा मांडगे रा. रांजणगाव मज्जिद, ता. श्रीगोंदा, किरण हौसराव सुरवसे रा. कारेगाव, ता. शिरूर, ऋषिकेश मधुकर देशमुख रा. बाभूळसर, ता. शिरूर, तन्मय नानासाहेब जगदाळे, दीपक नाना बोराडे रा. शिरूर, बाजीराव सिताराम शेळके रा. राजापूर, ता. श्रीगोंदा, अभिषेक यशवंत जोंधळे रा. शिरूर, मयूर रंगनाथ लंघे रा. करडे, ता. शिरूर, संजय हिराचंद पंडित रा. हडपसर, पुणे, प्रवीण गवळी (रा. वाघोली, पुणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी क्रमांक 3 ते 10 यांनी आरोपी लक्ष्मण उर्फ लखन किसन वीर याच्या सांगण्यावरून बनावट सोने खरे असल्याचे भासवून बँकेत गहाण ठेवले. त्याआधारे बँकेकडून गोल्ड लोन घेत बँकेची लाखोंची फसवणूक करण्यात आली. तसेच, बँकेकडून नियुक्त करण्यात आलेल्या गोल्ड लोन व्हॅल्युअर संजय हिराचंद पंडित याने संबंधित सोने बनावट असल्याची माहिती असूनही ते खरे असल्याचे प्रमाणपत्र दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान 25 मे रोजी रात्री 9.56 वाजता आरोपी लक्ष्मण उर्फ लखन किसन वीर व मच्छिंद्र दिगंबर खैरनार यांना अटक करण्यात आली आहे. यातील आरोपी लक्ष्मण वीर याला 29 मे पर्यंत पोलीस कोठडी, तर मच्छिंद्र खैरनार याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तिडके हे करीत आहेत.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 7 6 8 9 2
Users Today : 5
Users Yesterday : 154