रांजणगाव प्रतिनिधी -सुदर्शन दरेकर
रांजणगाव येथील एचडीएफसी बँकेत बनावट सोने गहाण ठेवून गोल्ड लोनद्वारे तब्बल 17 लाख 76 हजार 700 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात आरोपींनी बनावट सोने खरे असल्याचे भासवून बँकेत गहाण ठेवत गोल्ड लोन घेतल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच बँकेकडून नियुक्त गोल्ड लोन व्हॅल्यूअरनेही सोने बनावट असल्याची माहिती असतानाही ते खरे असल्याचे प्रमाणपत्र दिल्याचा आरोप आहे.
या गुन्ह्यातील मुख्य आरोपी लक्ष्मण उर्फ लखन वीर आणि मच्छिंद्र खैरनार यांना पोलिसांनी अटक केली असून, लक्ष्मण वीर याला 29 मे 2026 पर्यंत पोलीस कोठडी तर मच्छिंद्र खैरनार याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.







Users Today : 135
Users Yesterday : 898