शिरूर पोलीस स्टेशनमध्ये बकरी ईद सणानिमित्त शांतता समितीची बैठक

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी -सुदर्शन दरेकर
बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शिरूर पोलीस स्टेशन येथे सोमवार दि. 25 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस पोलीस स्टेशन हद्दीतील मोहल्ला कमिटी सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, विविध मस्जिदचे मौलाना तसेच मुस्लिम समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Screenshot

बैठकीत बकरी ईद सण शांततापूर्ण, सौहार्दपूर्ण व सामाजिक सलोखा जपत साजरा करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सणादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी, कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह वक्तव्य करू नये तसेच सोशल मीडियावर अफवा किंवा धार्मिक तेढ निर्माण करणारे संदेश प्रसारित करू नयेत, अशा सूचना पोलीस प्रशासनाकडून देण्यात आल्या.


तसेच कुर्बानी करताना स्वच्छतेची विशेष काळजी घेऊन नगरपालिका व ग्रामपंचायतीच्या नियमांचे पालन करावे, वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि कोणतीही संशयास्पद घटना आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिरूर शहर व परिसरात बकरी ईद सण शांततेत आणि बंधुभावाने साजरा करण्यासाठी पोलीस प्रशासनास पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 7 6 7 3 3
Users Today : 0
Users Yesterday : 263