सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये मेगा पूल कॅम्पस ड्राईव्ह २०२६ उत्साहात संपन्न ३०० विद्यार्थ्यांची नोंदणी; गुणवत्तेच्या जोरावर ११२ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:
दि. २१ मे २०२६ रोजी सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मेसी (बी. फार्मेसी व एम. फार्मेसी) येथे बहुराष्ट्रीय औषधनिर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य एमक्यूर फार्मास्युटिकल्स लिमिटेड, हिंजवडी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला “मेगा पूल कॅम्पस ड्राईव्ह २०२६” मोठ्या उत्साहात व यशस्वी वातावरणात संपन्न झाला.

या उपक्रमामध्ये पुणे, नगर व इतर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधून तब्बल ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.पार पडलेल्या निवड प्रक्रियेमध्ये वैयक्तिक मुलाखतींच्या माध्यमातून ११२ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली.

Screenshot

संस्थेच्या प्रशिक्षण व प्लेसमेंट उपक्रमांना मोठे यश मिळाले आहे.

ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी प्रा. विजया पडवळ यांनी विद्यार्थ्यांसाठी गेल्या वर्षभरात राबविण्यात आलेल्या इंडस्ट्री-इंटरॅक्शन सेशन्स, सर्टिफिकेशन कोर्सेस, औद्योगिक भेटी, तसेच विविध उद्योगांशी केलेल्या सामंजस्य करारांची माहिती दिली. उद्योग क्षेत्राच्या गरजांनुसार विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्यासाठी संस्थेचा सातत्यपूर्ण प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमास एमक्यूअर फार्मासुटीकल्स लि.चे वरिष्ठ अधिकारी कुणाल साबळे (सिनियर मॅनेजर),ओमप्रकाश नंदा (मॅनेजर),
दीपक पाटील (एचआर मॅनेजर) तसेच उमेश यशस्वी उपस्थित होते.
त्यांनी विद्यार्थ्यांना औषधनिर्मिती उद्योगातील करिअरच्या संधी, व्यावसायिक कौशल्ये आणि भविष्यातील प्रगतीच्या दिशा याबाबत मार्गदर्शन केले.


यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र थिटे उपस्थित होते. तसेच सचिव धनंजय थिटे, डॉ. हर्षवर्धन थिटे आणि संस्थेचे समन्वयक शिवाजीराव पडवळ यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या.

बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. सचिन कोठावदे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उद्योग व शिक्षण यांच्यातील दुवा अधिक मजबूत करण्यासाठी संस्थेचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल सातत्याने कार्यरत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रियांका वांजुळ यांनी केले, तर प्रा. प्रेरणा मोटे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. शंकर ढोबळे व सर्व प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 7 6 4 7 6
Users Today : 6
Users Yesterday : 469