शिरूर प्रतिनिधी -सुदर्शन दरेकर
घरातीलच आईचे सुमारे ९ तोळे सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या आरोपीला शिरूर पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत जेरबंद करत चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे शिरूर पोलिसांच्या तपास पथकाचे कौतुक होत आहे.


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मौजे चांडोह (ता. शिरूर) येथील दत्तात्रय बबन जाधव यांच्या घरातून ५ लाख ५ हजार रुपये किमतीचे ९ तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. फिर्यादी यांच्या पत्नी मंगल दत्तात्रय जाधव यांनी घरातील किचनमध्ये स्टीलच्या डब्यात दागिने ठेवले होते. २८ एप्रिल २०२६ रोजी ही चोरी उघडकीस आल्यानंतर शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. ३९८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटींग व तपास पथकाला आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या.
तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी रविंद्र दत्तात्रय जाधव (वय ३३, रा. चांडोह, ता. शिरूर) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने चोरीची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीस गेलेले सर्व सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले आणि पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटींग, पोलीस कर्मचारी संदीप खेडकर, अजय पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे तुषार पंधारे, जनार्धन शेळके आणि संजय जाधव यांचा समावेश होता.






Users Today : 15
Users Yesterday : 50