पत्रकार अर्जुन बढे यांचा मुलगा प्रणव बढे याचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश ; 97.40 टक्के गुणांनी शिरूरच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी :सुदर्शन दरेकर
शिरूर शहरातील पत्रकार व पारनेर तालुक्यातील जातेगाव येथिल भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष यांचा सुपुत्र तथा विद्याधाम प्रशाला, शिरूर येथील विद्यार्थी प्रणव अर्जुन बढे याने इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये तब्बल 97.40 टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

Screenshot

त्याच्या या उज्वल यशामुळे शिरूर शहरासह परिसरात त्याचे सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
अत्यंत जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर प्रणवने हे यश मिळवले आहे.

अभ्यासासोबतच वेळेचे योग्य नियोजन, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबीयांचा पाठिंबा यामुळे त्याला हे यश प्राप्त झाले. विद्यार्थीदशेत शांत, अभ्यासू आणि मेहनती स्वभावामुळे तो शाळेमध्ये नेहमीच शिक्षकांचा आवडता विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता.


प्रणव बढे यांच्या या यशामध्ये विद्याधाम प्रशाला, शिरूरचे मुख्याध्यापक गुरुदत्त पाचर्णे, वर्गशिक्षक मंगल भालेकर मॅडम ,तसेच कवाष्टे क्लासेसचे प्रसाद कवाष्टे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रणवने अभ्यासाची योग्य दिशा ठरवत सातत्याने मेहनत घेत उत्कृष्ट यश संपादन केले.
प्रणवच्या या यशाबद्दल शिरूरचे आमदार ज्ञानेश्वर कटके, पारनेर तालुक्याचे आमदार काशिनाथ दाते माजी आमदार अशोक पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस सिताराम लांडगे, शिरूर पंचायत समितीच्या सभापती स्वाती विठ्ठल घावटे, शिरूर नगरपालिका बांधकाम समितीचे सभापती सुनिल जाधव तसेच शिरूर तालुक्यातील पत्रकार मित्र, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी प्रणवचे अभिनंदन करून त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रणव बढे यांच्या या यशामुळे बढे कुटुंबीयांचा सन्मान वाढला असून शिरूर शहराच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 6 1 1 4
Users Today : 155
Users Yesterday : 360