दहावीच्या निकालात शिरूर तालुक्याची गुणवत्ता अव्वल; ३२ शाळांचा शंभर टक्के निकाल

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर | प्रतिनिधी : सुदर्शन दरेकर
शिरूर तालुक्यात यंदाच्या दहावीच्या परीक्षेच्या निकालात उल्लेखनीय यश मिळाले असून, गतवर्षीच्या तुलनेत तालुक्याची गुणवत्ता वाढल्याचे चित्र दिसून आले आहे. तालुक्यातील तब्बल ३२ शाळांनी शंभर टक्के निकालाची कामगिरी करत शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. विशेष म्हणजे, शहरी भागासोबत ग्रामीण भागातील शाळांनीही उत्कृष्ट निकाल नोंदवत गुणवत्ता सिद्ध केली आहे. तसेच मुलांच्या तुलनेत मुलींनी अधिक यश संपादन केल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे.
शिरूर, रांजणगाव गणपती, शिक्रापूर, पाबळ, कोरेगाव भीमा, निमोणे, सविंदणे, मांडवगण फराटा, करंदी, वढू बुद्रुक आदी भागातील अनेक शाळांनी ९० टक्क्यांहून अधिक निकाल नोंदविला.


तालुक्यातील विद्याधाम प्रशाला शिरूर (९९.७६%), विद्या विकास मंदिर निमगाव म्हाळुंगी (९९.०५%), श्री दत्त विद्यालय पिंपरखेड (९८.७८%), अभिनव विद्यालय सरदवाडी (९८.५९%), स्वातंत्र्य सेनानी स्व. एस. बी. डावखरे विद्यालय हिवरे (९८.३६%) आणि ज्ञानगंगा विद्यालय शिरूर (९७.४६%) या शाळांनी विशेष उल्लेखनीय कामगिरी केली.

Screenshot

यशस्वी विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक व शाळा व्यवस्थापनावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 6 1 1 6
Users Today : 157
Users Yesterday : 360