शिरूरमध्ये भाजपचा जल्लोष; पश्चिम बंगाल व आसाममधील यशाचा उत्साहात साजरा

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर | प्रतिनिधी:सुदर्शन दरेकर
शिरूर शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने पश्चिम बंगाल व आसाम राज्यांमध्ये मिळालेल्या उल्लेखनीय यशाचा जल्लोष मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील शिवसेना मंदिर परिसरात कार्यकर्त्यांनी एकत्र येत विजयाचा आनंद व्यक्त केला.


यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत वातावरण दणाणून सोडण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात “भारत माता की जय” तसेच “भाजपचा विजय असो” अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसरात जल्लोषपूर्ण वातावरण निर्माण केले. कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाडू भरवत आनंद साजरा केला.


या प्रसंगी शिरूर तालुका भाजपचे सरचिटणीस विजय नरके, नगरपरिषदेचे नगरसेवक उमेश शेळके, संतोष थेऊरकर, निलेश पवार, राजेंद्र लोळगे, आनंदराव भुजबळ, पुष्कराज पोटावळे, तसेच माजी नगरसेवक प्रकाश धारिवाल, माजी शहराध्यक्ष केशव लोखंडे, निलेश नवले, नवनाथ जाधव, आकाश चाटणे, राजेंद्र महाजन यांसह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, आगामी काळातही पक्ष अधिक बळकट करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Screenshot
punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 7 4 1 5 5
Users Today : 95
Users Yesterday : 470