Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

महाराष्ट्र दिनी ‘ड्राय डे’चा फज्जा लोहगाव-वाघोली रस्त्यावर हॉटेलमध्ये खुलेआम दारू विक्री

Facebook
Twitter
WhatsApp

कोरेगाव भिमा:प्रतिनिधी(विनायक साबळे)

१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभर ड्राय डे घोषित करण्यात आला असताना लोहगाव-वाघोली रस्त्यावर काही हॉटेलमध्ये खुलेआम दारू विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शासनाच्या आदेशाला धाब्यावर बसवत काही व्यावसायिकांकडून सर्रासपणे मद्यविक्री केली जात असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.


विशेष म्हणजे, उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस परिसरात उपस्थित असतानाही त्यांच्या समोरच दारू विक्री सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
त्यामुळे संबंधित विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही हॉटेलांकडे मद्यविक्रीसाठी आवश्यक परमिट लायसन्स नसल्याची देखील माहिती समोर येत आहे.


दरम्यान, ‘ड्राय डे’चे नियम धाब्यावर बसवणाऱ्या अशा हॉटेलांवर उत्पादन शुल्क विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे किमान लोहगाव व वाघोली पोलिसांनी तरी या प्रकरणाची दखल घेऊन तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून जोर धरत आहे.

Screenshot

शासनाच्या नियमांचे उघडपणे उल्लंघन होत असताना संबंधित यंत्रणा मात्र मूकदर्शकाची भूमिका घेत असल्याचे चित्र दिसत आहे. आता तरी प्रशासन जागे होऊन कठोर पावले उचलते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 9 7
Users Today : 5
Users Yesterday : 21