Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

रांजणगाव पोलिसांकडून आरोग्य तपासणी शिबिर; महिला कर्मचाऱ्यांच्या समस्यांवरही विशेष भर

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:सुदर्शन दरेकर
पोलिस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेऊन रांजणगाव पोलिस स्टेशन येथे विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिरूर उपविभाग, पुणे ग्रामीण यांच्या वतीने आयोजित या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


सकाळी 10 वाजता शिबिराचे उद्घाटन झाले. या प्रसंगी शिरूरचे एसडीपीओ प्रशांत ढोले प्रमुख उपस्थित होते. त्यांनी पोलिस दलातील तणावपूर्ण कामकाज लक्षात घेता नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व अधोरेखित केले.


या शिबिरात साईदीप हॉस्पिटल, अहिल्यानगर येथील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम – डॉ. अनिकेत कुऱ्हाडे, डॉ. स्मिता वाघमोडे, डॉ. कस्तुरी कुऱ्हाडे – यांनी पोलिस कर्मचाऱ्यांची सर्वांगीण आरोग्य तपासणी केली. रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार आदींची तपासणी करून आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात आले.

Screenshot

विशेष म्हणजे, महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी संबंधित समस्यांवरही या शिबिरात भर देण्यात आला. अनियमित कामाचे तास, वेळेवर आहार न घेणे, सततची धावपळ यामुळे उद्भवणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन डॉक्टरांनी मार्गदर्शन केले.


यावेळी पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे व पोलिस निरीक्षक संदेश केंजळे उपस्थित होते. या उपक्रमामुळे पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होऊन आवश्यक तपासणीची सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध झाली. उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 9 7
Users Today : 5
Users Yesterday : 21