शिरूर पोलिसांची काळ्या काचा लावणाऱ्या वाहणावर कडक कारवाई.. २९ वाहनांवर दंड, ४५ हजारांची वसुली-संदेश केंजळे पोलीस निरीक्षक

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी :सुदर्शन दरेकर
शहरातील वाहतूक शिस्तबद्ध करण्यासाठी शिरूर पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे. पोलिस निरीक्षक संदेश केंजळे व उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू असून, वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांनी शहर व परिसरात छापासत्र राबवले.
या मोहिमेदरम्यान राजेंद्र वाघमोडे, वीरेंद्र सुंबे आणि सचिन गोरे यांनी सक्रिय सहभाग घेत विविध ठिकाणी वाहनांची तपासणी केली. शिरूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका दिवसात तब्बल २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

Screenshot

या कारवाईतून एकूण ४५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली.


फॅन्सी नंबर प्लेट तसेच नियमबाह्य काळ्या काचा लावलेल्या वाहनांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. अशा वाहनांना थेट पोलिस ठाण्यात आणून संबंधित चालक किंवा वाहनमालकांकडून त्यांच्या हातानेच काळ्या काचा काढून घेण्यात आल्या.

वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध पुढील काळातही अशीच कडक कारवाई सुरू राहणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 5 7 5 2
Users Today : 153
Users Yesterday : 26