Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

म्हसे यांना मानाचा शब्दवेल नारीशक्ती सन्मान पुरस्कार

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे प्रतिनिधी : सागर पवार
सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ पनवेल यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जगतापवाडी शाळेच्या आदर्श शिक्षिका मिना अशोक म्हसे यांना साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्यस्तरीय शब्दवेल नारीशक्ती सन्मान पुरस्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षा व जेष्ठ लेखिका प्रतिभा सराफ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, मानपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

यावेळी कार्याध्यक्ष अश्विनी अलकरे, उद्घाटक डॉ. मंदा नांदुरकर, युवा कादंबरीकार पुष्पराज गावंडे, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख प्रभाकरराव चरडे, अक्षरक्रांती फाऊंडेशनचे अध्यक्ष शंकर घोरसे, अमरावती येथील बांधिलकी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा ॲड. डॉ. नीता कचवे आणि प्रविण बोपूलकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

शिक्षण, कला, व्यवसाय आणि साहित्य अशा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांच्या कार्याचा गौरव जागतिक महिला दिनानिमित्त करण्यात आला असून या वर्षी साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा सन्मान जगतापवाडी शाळेच्या आदर्श शिक्षिका मिना अशोक म्हसे यांना मिळाला. हा कार्यक्रम रविवारी दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी पुणे येथील वडगाव बुद्रुक येथे सकाळी १०.३० वाजता संपन्न झाला.
सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ या राज्यस्तरीय संस्थेच्या माध्यमातून समाजात सकारात्मक विचारांची प्रेरणा देण्याचे कार्य सातत्याने केले जाते. महिला दिनाच्या निमित्ताने कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा सन्मान करून समाजासमोर आदर्श उभा करण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे आहे, असे कार्यक्रमाचे संयोजक माधवी मोतलिंग, रामदास गायधने, विलास पुंडले आणि नलिनी पवार यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल चरडे यांनी केले. तर आभार प्रविण बोपूलकर यांनी मानले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 9 7
Users Today : 5
Users Yesterday : 21