प्रतिनिधी. संतोष साळुंके.
मांडवगण फराटा प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख मेडिकल ऑफिसर डॉ.नितीन फटाले सर यांना एम.बी.बी. एस नंतर
NEET PG परीक्षे मधून M.D .pulmonary medicine या संशोधन आणि अभ्यासक्रमासाठी जे.जे.हॉस्पिटल मुंबई येथे निवड करण्यात आली.

त्यांनी पाच वर्षाच्या कारकिर्दीत मांडवगण प्राथमिक आरोग्य केंद्रात अतिशय उत्तम सेवा बजावली.शासनाच्या आरोग्य विषयक शिबिर सर्व योजना ,जबाबदारीने सामान्य नागरिकांपर्यंत पोचवल्या, वाड्या वस्त्यांपर्यंत.लसीकरण योजना पोचवल्या.
तसेच आयुष्यमान भारत कार्ड,आभा कार्ड सारख्या शासनाच्या आरोग्य योजना कार्ड चे कॅम्प प्रत्येक वस्त्यांवर घेऊन ,या योजना पोचवल्या.या उच्च प्रशिक्षणासाठी त्यांची निवड झाल्याने त्यांच्यावर मांडवगण फराटा आणि परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या समयी त्यांना निरोप देताना सर्व आरोग्य कर्मचारी,आशा स्वयंसेविका,ग्रामस्थ उपस्थित होते.






Users Today : 197
Users Yesterday : 26