Breaking News
प्राथमिक आरोग्य केंद्र मांडवगण फराटा चे डॉ.नितीन फटाले सर यांची जे.जे हॉस्पिटल मुंबई.येथे निवड… *विश्व हिंदू परिषद बजरंग दल दुर्गावहिनी, शिरूर प्रखंड* आयोजित हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न शेती बांधामुळे होणारे तंटे, वाद टाळण्यासाठी मांडवगण फराटा तंटामुक्ती समिती चा अभिमानास्पद उपक्रम शिरूर तालुक्यातील अनेक मान्यवरांचा सत्कार समारंभ पंढरपूर येथे संपन्न….. मांडवगण मध्ये प्रा.संतोष परदेशी सर लिखित.यांच्या गावपण पुस्तकाचा प्रकाशन सोहळा.दिमाखात प्रतिनिधी.संतोष साळुंके शिरूर नगरपरिषद अभय योजनेसाठी अखेरचा एक दिवस बाकी …… जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा……

*विश्व हिंदू परिषद बजरंग दल दुर्गावहिनी, शिरूर प्रखंड* आयोजित हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:

शिरूर शहरात हनुमान जन्मोत्सवानिमित्त विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व दुर्गावहिनी यांच्या वतीने शिरूर शहरातील प्रभू श्री राम मंदिरामध्ये भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम अत्यंत भक्तीमय व उत्साही वातावरणात मोठ्या दिमाखात पार पडला.

शिरूर तालुक्यातील अनेक मान्यवरांचा सत्कार समारंभ पंढरपूर येथे संपन्न….. https://punegraminnews.com/archives/2814

कार्यक्रमाची सुरुवात हनुमंत रायांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर “राम नामाचा जयजयकार” करत सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्यात आले. पुढे भक्तिभावाने रामरक्षा स्तोत्र पठण झाले, ज्यामुळे परिसर पूर्णपणे राममय झाला.
या सोहळ्या मध्ये वीर बजरंगी सह महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. महिलांनी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

कार्यक्रमादरम्यान पावसाने हजेरी लावली असली तरी भक्तांच्या उत्साहात कोणतीही कमी आली नाही. पावसातही अखंड “राम नामाचा गजर” सुरूच राहिला — ही श्रद्धा आणि भक्तीची जिवंत अनुभूती ठरली.
यानंतर १५१ किलो लाडूंचा महाप्रसाद हनुमान चरणी अर्पण करून भव्य आरती करण्यात आली.

 

या १५१ किलो लाडू प्रसादाचे वितरण शिरूर मधील सर्व हनुमान मंदिरात करण्यात आले.

एकूणच, हा हनुमान जन्मोत्सव सोहळा भक्ती-शक्ती , श्रद्धा आणि उत्साहाचा अद्वितीय संगम ठरला असून शिरूर शहरात मोठ्या उत्साहात पार पडला.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 7 0 5 8 6
Users Today : 4
Users Yesterday : 167