संतप्त ग्रामस्थांकडून निकृष्ट दर्जाचे काम बंद करण्यात आले… प्रशासनाकडून उत्कृष्ट काम करण्याचे आदेश…

Facebook
Twitter
WhatsApp

मांडवगण प्रतिनिधी:संतोष साळुंके:
गणेगाव दुमाला ते बाभूळसर बुद्रुक ग्राम सडक योजने अंतर्गत सुरू असलेले काम संबंधित ठेकेदाराकडून अतिशय निकृष्ट पद्धतीने चाललेले असल्याचे दक्ष नागरिकांच्या लक्षात आले.

या घटनेने गणेगाव आणि बाभूळसर ग्रामस्थानी प्रशासन आणि ठेकेदार याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली व काम थांबविण्यास सांगितले.

सामाजिक कार्यकर्ते सुनील ढमढेरे,निलेश कोंडे यांनी ही बाब लक्षात आणून ठेकेदारास धारेवर धरले.सरपंच दीपालीताई महेंद्र नागवडे,शरद नागवडे,सुभाष निंबाळकर,अमित मचाले,अमित नागवडे,किरण राऊत यांनी काम दुबार करण्याची जोरदार मागणी केली.त्यामुळे साहजिकच सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदारास तेच काम दुबार उत्कृष्ट पद्धतीने करण्याचे आदेश दिले.

जागरूक आणि दक्ष नागरिकांमुळेच हे कामव्यवस्थित करण्याचे आदेश देण्यात आले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 6 8 1 8 7
Users Today : 5
Users Yesterday : 13