Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

दहावीच्या परीक्षा केंद्रावर श्रीरंग जाधव यांच्या भित्तीचित्रातून -कॉपी मुक्त अभियान !

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे प्रतिनिधी:सागर पवार
आज दहावीच्या परीक्षेच्या पेपरला सुरवात झाली.मरकळ येथील नवीन माध्यमिक विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर हरी उद्धव धोत्रे विद्यालयातील कलाशिक्षक श्रीरंग जाधव सर यांनी आपल्या रंग कुंचल्याच्या कलेतून तयार केलेल्या “कॉपी ” विषयारील विविध भित्तिचित्राचे “कॉपी मुक्त अभियान राबविण्यात आले आहे.


पुणे जिल्हा शिक्षणाधिकारी डॉ.भाऊसाहेब कारेकर यांच्या प्रेरणेतून हे कॉपी मुक्त अभियान राबविले जात आहे . केंद्रप्रमुख सौ छाया लाटे मॅडम यांनी प्रदर्शनाचे उद्घाटन केले.धोत्रे विद्यालयाचे मुख्याध्यापक सतीश केकांन सर यांनी कॉपीमुक्त परीक्षा या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या उपक्रमाचा उद्देश परीक्षांमध्ये वाढत चाललेली नकल संस्कृती थांबवून विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकता, आत्मविश्वास आणि स्वावलंबन वाढविणे हा आहे.
अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी “NO COPY MOVEMENT” चे विशेष लोगो, बॅनर व आकर्षक घोषवाक्यांच्या माध्यमातून नकलविरहित परीक्षा, स्वतःच्या मेहनतीवर विश्वास व प्रामाणिकतेचे मूल्य अधोरेखित केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कॉपी न करण्याचे महत्त्व समजावून सांगत प्रामाणिक प्रयत्नातून यश मिळवण्याचे उदाहरण दिले.

मरकळ चे सरपंच हनुमंत लोखंडे , आबा जाधव तुळापूर मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या .

Screenshot

केशवराज शिक्षण संस्था अध्यक्ष नामदेव आबा शिंदे ,उपाध्यक्ष शंकर भाऊ बाजीराव लोखंडे सचिव राहुल शेठ शिंदे,उपसरपंच शितल बाळासाहेब लोखंडे युवा युवा कार्यकर्ता विश्वास सुदाम लोखंडे ,पर्यवेक्षक शंकर विष्णू जाचक सूत्रसंचालन नाईकवाडी सर यांनी केले .

या चित्र प्रदर्शनात ५० प्रकारची विविध पोस्टर ठेवण्यात आली होती. आकर्षक घोषवाक्य “कॉपीची मजा – कारावासाची सजा !”,कॉपीचा छंद!- अभ्यास बंद!” ,”अभ्यासाची आवड ,-यशाची निवड !”विद्यार्थ्याच्या मनावर प्रभाव टाकणारी आहेत.
या उपक्रमात विद्यार्थ्यांसोबत पालकांचा सहभागही असून शाळा परीक्षांमध्ये शून्य नकल हे मुख्य उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शाळेच्या व्यवस्थापनाने अशा उपक्रमांची सतत गरज व्यक्त केली असून भविष्यात हा उपक्रम अधिक मोठ्या प्रमाणावर राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. सदर प्रदर्शन केंद्रावरील ४५० विद्यार्थी व पालक, शिक्षक व ग्रामस्थ यांनी पाहिले आहे .

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 9 7
Users Today : 5
Users Yesterday : 21