ॲनव्हॅलिअर इंडिया प्रा. लि.च्या CSR उपक्रमातून अभिनव विद्यालय, सरदवाडी येथे अत्याधुनिक STEM टिंकरिंग लॅबचे उद्घाटन

Facebook
Twitter
WhatsApp

सरदवाडी प्रतिनिधी-
(ता. शिरूर) येथील अभिनव विद्यालय, सरदवाडी येथे ॲनव्हॅलिअर इंडिया प्रा. लि. यांच्या सामाजिक बांधिलकी (CSR) उपक्रमांतर्गत उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक STEM टिंकरिंग लॅबचे उद्घाटन उत्साहात पार पडले.

या उद्घाटन सोहळ्यास कंपनीच्या HR BP सुष्मिता मिस्रा, शिरूर तालुक्याचे माजी आमदार तथा संस्थेचे अध्यक्ष सुर्यकांत (काका) पलांडे तसेच मान्यवर उपस्थित होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाची संधी उपलब्ध करून देणारा हा उपक्रम शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार तथा म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुर्यकांत (काका) पलांडे होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी ग्रामीण भागातील शाळांमध्ये अशा आधुनिक उपक्रमांची नितांत गरज असल्याचे सांगत, STEM टिंकरिंग लॅबमुळे भविष्यात वैज्ञानिक, अभियंते व उद्योजक घडण्यास हातभार लागेल, असा विश्वास व्यक्त केला.

कंपनीच्या HR BP सुष्मिता मिस्रा यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना STEM टिंकरिंग लॅब ही केवळ प्रयोगशाळा नसून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आकार देणारे व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन केले. नवकल्पना, टीमवर्क आणि समस्यांचे समाधान शोधण्याची वृत्ती विद्यार्थ्यांनी विकसित करावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी मॅनेजर संदीप जावळे यांनी कंपनीच्या CSR उपक्रमांतर्गत शिक्षणाला विशेष प्राधान्य देण्यात येत असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा देणे हा कंपनीचा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक शांताराम खामकर यांनी केले. STEM टिंकरिंग लॅबमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रयोगशीलता, संशोधनाची आवड, नवोपक्रमशील विचार विकसित होतील तसेच २१व्या शतकातील कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळेल, असे त्यांनी नमूद केले.

याच कार्यक्रमात उपशिक्षक संदीप सरोदे यांना डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुर्यकांत (काका) पलांडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

प्रमुख पाहुणे म्हणून HR BP सुष्मिता मिस्रा, HR संदीप जावळे, नितीन पाठक, प्रॉडक्शन मॅनेजर प्रफुल्ल भावसार, संस्थेचे उपाध्यक्ष सुदामराव चव्हाण, सचिव कांतिलाल टाकळकर, भिवाजी चौधरी, उद्योजक राहुल सरोदे, गणेश निचित तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिरूर ते पुणे प्लॉटिंग साठी जागा पाहता तर..

व्हॉटस नंबर वर sms करा:९८९०४५७९६९

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप सरोदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष सुदामराव चव्हाण यांनी केले.
या STEM टिंकरिंग लॅबच्या माध्यमातून अभिनव विद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोग, नवकल्पना आणि सर्जनशील विचारांना चालना मिळणार असून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला नवी दिशा मिळेल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 6 7 1 7 1
Users Today : 6
Users Yesterday : 7