शिरूरमध्ये उद्या डॉ. बाबा आढाव यांना श्रद्धांजली सभा!

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:
कामगार चळवळीचे प्रणेते, श्रमिकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर झगडणारे, अन्यायाविरोधात निर्भीडपणे उभे राहिलेले दैदिप्यमान व्यक्तिमत्त्व डॉ. बाबा आढाव यांचे कार्य आजही लाखो श्रमिकांचे मार्गदर्शन करत आहे.

ते शारीरिकरित्या आपल्यात नसले तरी त्यांची विचारधारा, त्यांची लढाऊ वृत्ती आणि कामगारांवरील अपार माया सदैव प्रेरणादायी राहील.

याच आदरभावातून शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उद्या डॉ. बाबा आढाव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही सभा शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती, हमाल पंचायत, आडते व्यापारी संघटना, असंघटित क्षेत्रातील कामगार, रिक्षा पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली असून, शहरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संजय बारवकर यांनी केले आहे.


श्रमिकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढलेल्या नेत्याला शिरूर शहर आपली आदरांजली वाहणार आहे.
सभेसाठी सर्वांनी उपस्थित राहून या महान नेत्याला अभिवादन करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 6 7 1 6 9
Users Today : 4
Users Yesterday : 7