ताथवडे शाळेचे बीट स्तरावर दैदिप्यमान यश श्रावणी गोरे व आदर्श राठोड बीट स्तरावर प्रथम

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे प्रतिनिधी:
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताथवडे येथील शाळेने बीट स्तरावर दैदिप्यमान यश प्राप्त केले असून तब्बल दोन विद्यार्थ्यांनी चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे.

यात गीत गायन स्पर्धेत आदर्श राठोड तर वक्तृत्व स्पर्धेत श्रावणी गोरे यांनी प्रथम क्रमांक मिळवत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

मारुंजी केंद्रातील उपक्रमशील अशा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताथवडे येथील विद्यार्थ्यांनी बीट स्तरावर दैदिप्यमान यश मिळवले असून
गीत गायन स्पर्धेत इयत्ता सातवीतील आदर्श राठोड व वक्तृत्व स्पर्धेत श्रावणी गोरे यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर उंच उडी स्पर्धेत इयत्ता चौथीच्या प्राची गौतम आणि वैयक्तिक गायन स्पर्धेत इयत्ता पाचवीच्या श्रुती जामणीक यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे. शाळेला मिळालेल्या या उत्तुंग यशाबद्दल केंद्रप्रमुख सुरेश साबळे यांनी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या भरगोस यशाबद्दल शाळेने पुष्पगुच्छ देऊन मुलांचे कौतुक केले.

यावेळी कार्यक्रमाला मुख्याध्यापक संगिता सूर्यवंशी, कविता मोहिते, भारती जाधव, अनामिका मांडवगडे, जयश्री दांगडे, सारिका भालेकर, प्रियंका कावरे, मुकूंद गावडे आणि साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर उपस्थित होते.

सूत्रसंचालन व आभार:

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर यांनी केले. तर मुख्याध्यापक संगिता सूर्यवंशी यांनी आभार मानले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 6 7 1 7 1
Users Today : 6
Users Yesterday : 7