Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

हेमंत इनामे हा पोलिस, कायद्याचा रक्षक की,भक्षक? चार वाहने व अनेकाना केले जखमी..

Facebook
Twitter
WhatsApp

[पोलिस हेमंत इनामे हा दारू पिऊन गाडी चालवत असल्यामुळे गाडीवर नियत्रण सुटून हा अपघात झाल्याची सध्या चर्चा होत,असून सामान्य नागरिकांप्रमाणे रांजणगाव पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक आम्हाला न्याय देतील का?]

 

कोरेगाव भिमा प्रतिनिधी(विनायक साबळे)- कर्तव्य बजावून घरी जात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे वाहनावरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात सातजण गंभीर जखमी झाले आहेत. सदर घटना कारेगाव (ता. शिरुर) हद्दीत अहिल्यानगर – पुणे महामार्गावर यश इन चौकातील आयुष बार समोर सोमवार (दि.१३) रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याबाबत अनिल भागवत काठुळे (वय -२५) व्यवसाय – रिक्षा ड्रायव्हर, सध्या रा. कारेगाव ता. शिरुर जि. पुणे, मूळ रा. किट्टेआडगाव ता. माजलगाव जि. बीड यांनी रांजणगाव एम आय डी सी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
रांजणगाव एम आय डी सी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव एम आय डी सी पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचारी हेमंत इनामे हे आपल्या किया गाडी क्रमांक एम एच १२ व्ही.क्यू २१८८ या गाडीने शिक्रापूरकडे जात होते. ते यश इन चौकात आल्यावर त्यांचा गाडीवरील ताबा सुटला होता. त्यामुळे रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या वाहनांना त्यांनी जोरदार धडक दिली. या धडकेत वाहनांजवळ उभे असलेल्या पुरुषोत्तम भागवत काठोळे (वय – २४), अभिषेक राजेंद्र पवार (वय- २२), संधी परमेश्वर मस्के (वय – १९), किशोर वसंत राठोड, आरती किशोर राठोड, सुमित बबन मगर, नितीन कमलेश चौधरी सर्व रा. कारेगाव ता. शिरुर जि. पुणे हे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी पोलिस कर्मचारी हेमंत इनामे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक चव्हाण हे करीत आहेत.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 9 9
Users Today : 7
Users Yesterday : 21