वेगवेगळ्या कामात अग्रेसर असणाऱ्या महिलांना नवदुर्गा पुरस्कार प्रदान…

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:
शिरूर तालुक्यात अनेक कामात अग्रेसर असणाऱ्या ,तसेच आपल्या कामात चोख भूमिका निभावणाऱ्या महिलांचा यश किर्ती सामाजिक संस्था व भूमाता ब्रिगेड यांच्या वतीने
दि.२६/०९/२०२५ रोजी शिरूर पोलिस स्टेशन येथे ,पोलिस निरीक्षक संदेश केंजळे ,यश किर्ती सामाजिक संस्था अधक्ष मंगल सासवडे व शिरूर तालुका सरचिटणीस सुषमा गायकवाड यांच्या हस्ते नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

उपस्थित मान्यवर:

यावेळी महिला दक्षता समिती महाराष्ट्र अध्यक्ष शोभना ताई पाचांगे,सामाजिक कार्यकर्त्या सविता बोरुढे,भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश चिटणीस रेशमा शेख, पत्रकार प्रवीण गायकवाड, प्रीती बनसोडे उपस्थित होते.

नवदुर्गा :

यावेळी महिला निर्भीड पत्रकार म्हणून शोभा परदेशी, दिपाली काळे तर सिने अभिनेत्री म्हणून किरण झांबरे , दबंग पोलिस म्हणून भाग्यश्री जाधव तर एस.टो वाहतूक दबंग अधिकारी मनीषा गायकवाड या सर्व महिलांना नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

 

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 5 5 2 9 9
Users Today : 7
Users Yesterday : 22