डॉ. पवन सोनवणे यांच्या राजकारणाच्या एंट्रीने वाघोलीत राजकीय गणिते बदलणार.

Facebook
Twitter
WhatsApp

कोरेगाव भीमा प्रतिनिधी(विनायक साबळे)

आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर वाघोलीच्या राजकारणात एक जबरदस्त भूकंप घडवणारी एंट्री सध्या चर्चेचा विषय बनली आहे. वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय सेवा देणारे आणि समाजाभिमुख कार्याच्या जोरावर जनतेच्या मनात विश्वास निर्माण करणारे डॉ. पवन सोनवणे हे आता राजकारणात सक्रिय होण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे वाघोलीतील राजकीय वातवरण तापले असून, प्रस्थापितांसमोर खडतर आव्हान उभं राहिल्याचं चित्र आहे.

उच्चशिक्षित, तरुण आणि संवेदनशील नेतृत्व असलेले डॉ. सोनवणे यांनी गेल्या काही वर्षांत आरोग्य शिबिरे, मोफत तपासणी मोहीमा, जनजागृती कार्यक्रम अशा उपक्रमांतून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. डॉक्टर्स संघटनांमधील सक्रीय सहभाग, वैद्यकीय प्रश्नांवर अभ्यासपूर्ण भुमिका आणि समाजातील शेवटच्या घटकासाठी काम करण्याची त्यांची वृत्ती यामुळे ते केवळ डॉक्टर नाही, तर जनतेचा ‘आश्वासक नेता’ म्हणून ओळखले जात आहेत.

वाघोली प्रभाग हा अनुसूचित जातींसाठी राखीव असून, त्या पार्श्वभूमीवर डॉ. सोनवणे यांच्या नावाची चर्चा वेगाने पुढे येत आहे. त्यांच्याजवळ माजी मंत्री एकनाथ खडसे कुटुंबीयांसह विविध पक्षांतील नेत्यांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याने, त्यांना सर्व पातळ्यांवर मजबूत पाठबळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या घडामोडींमुळे वाघोलीतील अनेक प्रस्थापित गटांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. डॉ. सोनवणे यांच्या संयमी पण धारदार जनसंपर्क मोहिमेने आधीच त्यांच्याभोवती जनसमर्थनाचा आधारभूत पाया तयार केला आहे.

लवकरच होणार अधिकृत घोषणा?
डॉ. पवन सोनवणे लवकरच अधिकृतरित्या निवडणूक रिंगणात उतरण्याची घोषणा करतील, अशी शक्यता असून, त्यांच्या उमेदवारीमुळे वाघोलीतील निवडणूक रंजक आणि चुरशीची होणार, हे स्पष्ट आहे.

“डॉक्टर की नेता?” या प्रश्नाचं उत्तर वाघोलीकडून लवकरच मिळणारच आहे, पण इतकं निश्चित की, या नव्या चेहऱ्याच्या प्रवेशाने वाघोलीच्या राजकीय पटावर एक भक्कम आणि वैचारिक नेतृत्व उदयास येण्याची शक्यता दाट आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 4 2 1 0 3
Users Today : 41
Users Yesterday : 503