अन्यथा मोठे जण अंदोलन करण्यात येईल: माळवे

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी :
राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच म.राज्य.अध्यक्ष जनहित विधी किशोर शिंदे ,अरुण लंबगोळ (उपाध्यक्ष. म. राज्य ) यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 19/6/2025 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने *हिंदी भाषा सक्ती विरोधात* शिरूर तालुका गट शिक्षण अधिकारी कळमकर व शिंदे विस्तार अधिकारी शिरूर यांना मनसे जनहित विधी जिल्हाध्यक्ष ऍड. स्वप्नील किशोर माळवे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट स्वप्निल माळवे यांनी हिंदी भाषा सक्ती तात्काळ मागे घ्यावी,अशी निवेदनाद्वारे आज शिरूर गटशिक्षणाधिकारी कार्यालय यांना विनंती केली आहे.

हिंदी भाषा सक्तीने काय होणार

महाराष्ट्र शासनाने हिंदी भाषा शैक्षणिक धोरण म्हणून लादली असून ,मराठी भाषेचा दर्जा कमी करण्याचे काम ह्या शासनाकडून चालू आहे. तसेच मराठी भाषासाठी पर्यायी भाषा म्हणून हिंदी भाषा सक्ती नको त्यामुळे ती तात्काळ काढून टाकावी.

तसेच संपूर्ण शाळांना तात्काळ याबाबत कळविण्यात यावे.असे या निवेदनात माळवे म्हणाले आहेत. हिंदी भाषा सक्ती केल्यास मोठे जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात त्यांनी यावेळी दिला आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 4 2 1 0 4
Users Today : 42
Users Yesterday : 503